लिफ्टच्या बहाण्याने तरुणावर चाकू हल्ला

लिफ्टच्या बहाण्याने एका तरुणावर चाकू हल्ला (Solapur stabbing on man) करण्यात आला आहे. ही घटना सोलापुरातील बार्शी मार्गावर घडली.

लिफ्टच्या बहाण्याने तरुणावर चाकू हल्ला

सोलापूर : लिफ्टच्या बहाण्याने एका तरुणावर चाकू हल्ला (Solapur stabbing on man) करण्यात आला आहे. ही घटना सोलापुरातील बार्शी मार्गावर घडली. या हल्ल्यात बाईकस्वार गंभीर जखमी (Solapur stabbing on man) असून त्याच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परमेश्वर सोनावणे असं जखमी मुलाचे नाव आहे.

परमेश्वर बार्शी मार्गावरुन मानकेश्वर गावाकडे परतत असताना एका तरुणाने लिफ्ट मागितली. यावेळी परमेश्वरने या अज्ञात व्यक्तीला लिफ्टही दिली. पण लिफ्ट देणे परमेश्वरला चांगलेच महागात पडले आहे. लिफ्ट दिल्यानंतर या अज्ञात व्यक्तीने लघवीचा बहाणा केला आणि परमेश्वरवर चाकू हल्ला करत पैशाची मागणी केली.

“मी कामावरुन गावाकडे जात होतो. या दरम्यान रस्त्यात अनोळखी व्यक्तीने माझ्याकडे लिफ्ट मागितली. पुढे जाऊन त्या व्यक्तीने गाडी थांबवण्यास सांगितली. गाडीवरुन उतरल्यावर त्याने माझ्या गळ्याला चाकू लावला. मी म्हटले माझ्याकडे पैसे नाहीत. त्यानंतर त्याने चाकूने वार करत पळून गेला”, असं जखमी परमेश्वर सोनावणे याने सांगितले.

परमेश्वर सोनावणे हा गवंडी काम करतो. पहिल्यांदाच या मार्गावर अशी घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.


Published On - 3:30 pm, Fri, 22 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI