Unlock | अखेर थिएटर्स उघडणार, 50 टक्के क्षमतेची मर्यादा, सरावासाठी स्वीमिंगपूलही खुले

राज्यात उद्या 5 नोव्हेंबरपासून थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Unlock | अखेर थिएटर्स उघडणार, 50 टक्के क्षमतेची मर्यादा, सरावासाठी स्वीमिंगपूलही खुले
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 5:08 PM

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात उद्या 5 नोव्हेंबरपासून थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच योगा, स्विमिंगपूलसह बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश आणि शुटिंग रेंज आदी इनडोअर खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले थिएटर्स अखेर उद्यापासून उघडणार आहेत. या निर्णयाने थिएटर्स मालक आणि बॉलिवूडकरांना दिलासा मिळाला आहे (Unlock 6 Guidelines Theaters Will Start From 5th November).

त्याशिवाय राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठीच स्विमिंग पूल सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं लागणार आहे. तसेच, कंटेन्मेंट झोनमध्ये या सर्व गोष्टींना बंदी कायम राहणार असल्याचंही राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने आज एक आदेश जारी केला आहे (Unlock 6 Guidelines). त्यानुसार, कंटेन्मेंट झोन वगळता राज्यात सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी 50 टक्के प्रेक्षक क्षमतेची अट घालण्यात आली आहे. शिवाय कंटेन्मेंट झोनमधील थिएटर आणि सिनेमागृहांवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स उघडताना राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

स्विमिंग पूल सुरु, पण…

राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी जलतरण तलाव सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटूंनाच तूर्तास तरी त्याचा लाभ घेता येणार आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

योगालाही परवानगी

कंटेन्मेंट झोनबाहेरच्या योगा इन्स्टिट्यूटला सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्या 5 नोव्हेंबरपासून योगा प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार असून त्यांनाही नियमांचं पालन करणं बंधनकारक राहणार आहे.

बॅडमिंटन, टेनिस बिनधास्त खेळा, पण…

राज्य सरकारने बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश आणि शुटिंग रेंजच्या इनडोअर खेळास परवानगी दिली आहे. उद्यापासून इनडोअर बॅडमिंटन आणि टेनिस खेळता येणार आहे. त्यासाठीही नियमांचं पालन आवश्यक असेल असं सरकारी आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Unlock 6 Guidelines Theaters Will Start From 5th November

संबंधित बातम्या : 

Unlock 5 Guidelines : राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु, थिएटर्स, शाळा बंदच

Unlock 4 | ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार

Unlock-4 : थिएटर उघडण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली, मेट्रोही धावण्याची शक्यता, अनलॉक 4 मध्ये काय सुरु होणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.