उन्नाव बलात्कार : माजी आमदार कुलदीप सेंगरसह 7 जणांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा

उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपी माजी भाजप आमदार कुलदीप सेंगरला न्यायालयाने 10 वर्ष कारवासाची (Unnao Rape Case) शिक्षा सुनावली आहे.

उन्नाव बलात्कार : माजी आमदार कुलदीप सेंगरसह 7 जणांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा
Follow us
| Updated on: Mar 13, 2020 | 4:47 PM

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपी माजी भाजप आमदार कुलदीप सेंगरला न्यायालयाने 10 वर्ष कारवासाची (Unnao Rape Case) शिक्षा सुनावली आहे. कुलदीप सेंगरसह 7 जणांना न्यायालयाने 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली यांना दोषी ठरवलं आहे. त्यासोबत सेंगर आणि त्याच्या भावाला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.

नवी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या (Unnao Rape Case) निर्णयानुसार, उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोपी कुलदीप सेंगरला गेल्यावर्षी न्यायालयाने दोषी ठरवले होते. उन्नाव पीडितेच्या वडिलांचा एप्रिल 2018 मध्ये पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायालयाने आज (13 मार्च) सुनावणी केली.

उन्नाव बलात्कार : आमदार कुलदीप सेंगरला आजन्म कारावास

यावेळी न्यायालयाने कुलदीप सेंगरसह सहा जणांना दोषी ठरवले. या सर्व आरोपींना 10 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. तर सेंगर आणि त्याच्या भावाला 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या दंडाची रक्कम पीडितेच्या कुटुंबाला दिली जाणार आहे.

याप्रकरणी 4 मार्चपर्यंत तीस हजारी कोर्टात सुनावणी सुरु होती. यात 11 आरोपींमधून 7 जणांना दोषी ठरवले होते. आरोपी कुलदीप सेंगरसोबतच पोलीस अधिकारी कामता प्रसाद, अशोक सिंह भदौरिया, विनीत मिश्रा उर्फ विनय मिश्रा, विरेंद्र सिंह उर्फ बऊवा सिंह, शशी प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह आणि जयदीप सिंह उर्फ अतुल सिंह यांचा समावेश आहे.

कोर्टाने कुलदीप सिंह याला 304 आणि 120 B कलमांतर्गत दोषी ठरवले होते. तर अमीर खान, शरदवीर सिंह, राम शरण सिंह उर्फ सोनू सिंह, शैलेंद्र सिंह यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली (Unnao Rape Case) होती.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 2017 मध्ये त्यावेळी अल्पवयीन असलेल्या तरुणीचं अपहरण करुन सेंगरने लैंगिक अत्याचार केले होते. चार वेळा आमदार असलेल्या कुलदीपसिंह सेंगर याची ऑगस्ट महिन्यात भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती. कोर्टाने या प्रकरणातील अन्य आरोपी शशी सिंग याला निर्दोष सोडलं आहे.

कलम 120 ब (गुन्हेगारी कट रचणे), 363 (अपहरण), 366 (लग्नास उद्युक्त करण्यासाठी एखाद्या महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याशी (पोक्सो) संबंधित इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार लखनौ येथील कोर्टाकडून ही केस दिल्लीला वर्ग करण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनी ऑगस्टपासून या खटल्याची नियमित सुनावणी केली.

उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, डॉक्टरांना अखेरची इच्छा सांगत प्राण सोडले

जुलैमध्ये फिर्यादी तरुणीच्या कारला भीषण अपघात झाला होता. यामध्ये बलात्काराच्या प्रकरणातील महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेली तिची मावशी मृत्युमुखी पडली होती, तर फिर्यादी तरुणी, तिची दुसरी मावशी आणि तरुणीचा वकील गंभीर जखमी झाले होते. कार दुर्घटनेमागे सेंगर असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला होता.

एप्रिल 2018 मध्ये तरुणीच्या वडिलांना बेकायदा शस्त्रास्त्र प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर सेंगर, त्याचा भाऊ आणि इतर नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला (Unnao Rape Case) होता.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.