अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराची भीती?, नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजना

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेत हिंसाचार होण्याच्या शक्येतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (US presidential election result people afraid violence at white house)

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचाराची भीती?, नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजना
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 4:22 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे आहे. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यामध्ये ही लढत होत आहे. बायडेन आणि ट्रम्प यांनी जोरादर प्रचार अभियान राबवले. मात्र, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेत हिंसाचार होण्याच्या शक्येतेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. FBI आणि NSA या सुरक्षा संस्थांनी याबाबत एक रिपोर्ट दिला आहे. यानंतर अमेरिकेतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (US presidential election result people afraid violence at white house)

व्हाईट हाऊसच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांनी आणि दुकानदारांनी त्यांची कार्यालये आणि दुकांनाच्या काचा लाकडी आच्छादनाने झाकण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प हॉटेलच्या समोरील भागातील बिल्डींमध्येही लोक सुरक्षेच्या उपाययोजना करत आहेत. टीव्ही 9 भारतवर्षने याबाबत वृत्त दिले आहे.

ब्लॅक लाईव्ह मॅटर्स आंदोलनादरम्यान हिंसा

अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी ब्लॅक लाईव्ह मॅटर्स आंदोलन झाले होते. त्या दरम्यान वॉशिग्टनमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली होती. आता राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर हिंसा होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

मार्क झुकरबर्ग यांच्याकडून ही असंतोष व्यक्त होण्याची भीती

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या काळात अमेरिकन नागरिकांकडून असंतोष व्यक्त केला जाऊ शकतो, अशी शंका झुकरबर्ग यांनी व्यक्त केली आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg on US Election 2020) म्हणाले, “आपला देश विभागलेला दिसत आहे याची मला काळजी वाटते. जर निवडणुकीला काही दिवसांचा अथवा आठवड्याचा उशीर झाला तर नागरिकांमधून असंतोष व्यक्त होऊ शकतो. पुढील आठवडा फेसबुकसाठी अग्निपरीक्षा घेणारा असणार आहे. आतापर्यंत फेसबुकने केलेल्या कामावर आम्हाला अभिमान आहे. 3 नोव्हेंबरनंतरही आमचं काम सुरुच राहिल.”

गेल्या काहीं दिवसांमध्ये शस्त्रखरेदी वाढली

अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून शस्त्रविक्रीत अचानक मोठी वाढ झाली आहे. निकालानंतर अमेरिकेत हिंसाचार उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्रखरेदीचा सपाटा लावला होता. हे प्रमाण इतके वाढले की, अखेर अमेरिकेतील वॉलमार्टच्या दुकानांतील बंदुका आणि शस्त्रविक्रीचा विभाग बंद करण्यात आला.

20 जानेवारीला शपथविधी

अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी 20 जानेवारीला होणार आहे. यासाठी अमेरिकेची संसद म्हणजेच कॅपिटल बिल्डींग आणि इतर भागात जोरदार तयारी सुरू आहे. कॅपिटल बिल्डींग परिसरात सुशोभीरकरण करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती; सामान्य नागरिकांकडून पिस्तुल आणि बंदुकांच्या खरेदीचा सपाटा

US Election 2020 : अमेरिकेत निकालाला उशीर झाल्यास असंतोषाची शक्यता : फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग

(US presidential election result people afraid violence at white house)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.