सुशांतच्या आत्महत्येनंतर दहावीतील विद्यार्थ्याचाही गळफास

टीव्हीवर सुशांतच्या आत्महत्येची बातमी पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका दहाव्या वर्गातील विद्यार्थाने आत्महत्या केली.

सुशांतच्या आत्महत्येनंतर दहावीतील विद्यार्थ्याचाही गळफास
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 7:06 PM

लखनऊ : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Bareilly 10th Student Commit Suicide) आत्महत्येने संपूर्ण देश हादरला. सुशांतने (Sushant singh rajput) अशा प्रकारे अचानक एक्झिट घेतल्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मात्र, सुशांतने असं का केलं हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थ्यानेही गळफास घेत जीवन संपवलं. टीव्हीवर सुशांतच्या आत्महत्येची बातमी पाहिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका दहावीतील विद्यार्थाने आत्महत्या केली. ‘सुशांत करु शकतो तर मी का नाही’, असं या विद्यार्थ्याने त्याच्या सुसाईट नोटमध्ये लिहिलं (Bareilly 10th Student Commit Suicide) आहे.

दहाव्या वर्गातील या विद्यार्थ्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं, “माझ्यात तृतीयपंथींसारखी लक्षणं होती आणि माझा चेहराही मुलींसारखा होता. त्यामुळे लोक माझी खिल्ली उडवत होते. त्यामुळे मलाही असं वाटू लागलं होतं की मी तृतीयपंथी आहे. त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या करण्यापलीकडे कुठला दुसरा मार्गच उरला नाही”.

“मी आत्महत्या केली नाही तर माझ्या तृतीयपंथी असण्याने माझ्या वडिलांच्या आयुष्याला ग्रहण लागेल”, असंही त्याने लिहिलं. त्याशिवाय, तो एक गायक होता आणि त्याला लहान मुलांना आर्ट शिकवायचं होतं, असंही त्याने या सुसाईड नोटमध्ये लिहिलं.

आपल्या मुलाची सुसाईड नोट वाचून त्याचे वडील भावूक झालेत. त्यांचा मुलगा इतकं चांगलं चित्र काढायचा की शाळेतील शिक्षकही त्याचं कौतुक करायचे, असं या विद्यार्थ्याच्या वाडिलांनी सांगितलं.

या विद्यार्थ्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, “माझ्या अंत्यसंस्काराला त्या सर्वांना बोलवा, जे माझा द्वेष करायचे”. मात्र, त्याने त्याच्या मृत्यूसाठी कुणालाही दोष दिलेला नाही (Bareilly 10th Student Commit Suicide).

“टीव्हीवर सुशांतच्या आत्महत्येची बातमी पाहिल्यानंतर तो म्हणाला की आपल्यालाही सुशांतप्रमाणे गळफास घ्यायला हवा. जर मोठे फिल्म स्टार्स आत्महत्या करु शकतात तर आपण का नाही करु शकत”, असं आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्याच्या लहान भावाने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांचं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे. त्याला आई नाही. या विद्यार्थ्याने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे (Bareilly 10th Student Commit Suicide).

संबंधित बातम्या :

यशराज फिल्म्स, सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करा : दबंगच्या दिग्दर्शकाची मागणी

Sushant Singh Rajput | इकडे सुशांतवर अंत्यसंस्कार, तिकडे वहिनीनेही प्राण सोडले, राजपूत कुटुंबावर पुन्हा आघात

Sushant Singh Rajput suicide l बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.