बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन, 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बंगाली सिनेमातील जेष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं कोलकातामधील खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. कोलकातामधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Soumitra Chatterjee passes away)

बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन, 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 2:12 PM

कोलकाता : नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे कोलकातामधील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सत्यजीत राय यांच्या “अपूर संसार” या चित्रपटाद्वारे सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ( Veteran Bengali actor Soumitra Chatterjee passes away at the age of 85 )

जेष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांची कोरोना चाचणी 6 ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले होते पण त्यांची तब्येत खालावली होती. बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांच्यावर डॉक्टरांकडून सातत्यानं उपचार सुरु होते. मात्र, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर आज त्यांचे निधन झाले.

सौमित्र चॅटर्जी यांचे वय 85 वर्ष होते. त्यांच्या रक्तातील यूरिय आणि सोडियमचे प्राण वाढले होते. कोरोना संसर्ग झाल्यापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. सौमित्र चॅटर्जी यांनी प्रामुख्यानं बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं वेगळ स्थान होते. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1935 ला कोलकातामध्ये झाला होता. अभिनयाचा वारसा सौमित्र चॅटर्जी यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता.

ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत राय यांच्या अनेक चित्रपटांमध्ये सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय केला होता. 1959 ते 1990 पर्यंत त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले.

सौमित्र चॅटर्जी यांनी 1959 मध्ये सत्यजीत राय यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सत्यजीत राय यांच्या 14 चित्रपटांमध्ये सौमित्र चॅटर्जी यांनी अभिनय केला होता. फ्रान्सचा Ordre des Arts et des Lettres हा सर्वोत्तम पुरस्कार मिळवणारे सौमित्र चॅटर्जी पहिले भारतीय होते. त्यांना 3 राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी, 7 फिल्मफेअर अवार्ड आणि भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.

सौमित्र चॅटर्जी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

‘लागिर झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

Actor Asif Basra suicide : आसिफ बसरांच्या निधनाने बॉलिवूडजगतात खळबळ, इम्रान हाश्मीकडून श्रद्धांजली

( Veteran Bengali actor Soumitra Chatterjee passes away at the age of 85 )

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.