ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन

ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील समांतर चित्रपट चळवळीचे आधारस्तंभ आणि भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. आज सकाळी 10.30 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवलेले मृणाल सेन सत्यजित रे यांचे समकालीन होते. बंगाली सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यास मृणाल सेन यांनी अथक प्रयत्न केले. बंगाली सिनेमाला आशयघन बनवण्यातही […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील समांतर चित्रपट चळवळीचे आधारस्तंभ आणि भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. आज सकाळी 10.30 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.

‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवलेले मृणाल सेन सत्यजित रे यांचे समकालीन होते. बंगाली सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यास मृणाल सेन यांनी अथक प्रयत्न केले. बंगाली सिनेमाला आशयघन बनवण्यातही त्यांनी प्रचंड योगदान दिले आहे.

14 मे 1923 रोजी फरिदापूर (सध्या बांगलादेश) येथे मृणाल सेन यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी ते कोलकात्यात स्थायिक झाले. स्कॉटिश चर्च कॉलेजमधून फिजिक्सचं शिक्षण घेतल्यानंतर कोलकाता विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. भारतीय साम्यवादी पक्षाच्या सांस्कृतिक शाखेत ते कार्यरत झाले. पुढे पक्षाचे सदस्यही बनले. मार्क्सवादी विचारांशी त्यांनी शेवटपर्यंत बांधिलकी जपली.

1955 साली ‘रातभोर’ सिनेमातून मृणाल सेन यांनी दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘नील अकाशेर निचे’ या सिनेमाने त्यांनी खरी ओळख मिळवून दिली. ‘बैशे श्रावन’ या सिनेमाने त्यांच नावं आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. ‘आमार भुवन’ या 2002 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाचं त्यांनी शेवटचं दिग्दर्शन केलं.

भारत सरकारने मृणाल सेन यांना ‘पद्मभूषण’, तर रशियन सरकारने त्यांना ‘ऑर्डर ऑफ फ्रेण्डशिप’ सन्मान देऊन गौरवलं आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडून आदरांजली :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें