तुळजाभवानी मंदिरात VIP भक्तांचा सुळसूळाट; नियम मोडून आमदार, अभिनेत्यांना दर्शन

एकीकडे सर्वसामान्य भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तासोनतास रांगेत उभा राहिलेले असताना दुसरीकडे मंदिरात VIP दर्शन सुरू केलं आहे.

तुळजाभवानी मंदिरात VIP भक्तांचा सुळसूळाट; नियम मोडून आमदार, अभिनेत्यांना दर्शन
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 3:54 PM

राज्य सरकारने पाडव्यापासून मंदिरे खुली केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी VIP भक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. एकीकडे सर्वसामान्य भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तासोनतास रांगेत उभा राहिलेले असताना दुसरीकडे मंदिरात VIP दर्शन सुरू केलं आहे. व्हीयापीच्याच्या नावाखाली मंदिरातील गैरकारभार उघड झाला असून रजिस्टरची एक्सकलुसिव्ह कागदपत्रं टीव्ही 9 च्या हाती लागली आहेत. (VIP devotees in Tulja Bhavani temple for darshan)

व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली आमदारांचे पीए, प्रशासकीय अधिकारी यांनी थेट दर्शन घेत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे कोपरगाव इथले आमदार आशुतोष काळे, सिने अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी सहकुटुंब व्हीआयपी कोट्यातून दर्शन घेतलं. तुळजाभवानी मंदिरात यापूर्वीही व्हीआयपी दर्शनाचा मोठा घोटाळा उघड झाला होता. आता मंदिर उघडल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी VIP पद्धत बाजूला सारत कोरोना काळात तुळजाभवानी मातेचे मंदिराच्या प्रवेशद्वारहुन दर्शन घेतलं होतं तर दुसरीकडे आमदार, त्यांचे पीए आणि इतर प्रशासकीय अधिकारी वशिलेबाजी करीत दर्शन घेत आहेत.

10 वर्षाखालील बालकांना मंदिर प्रवेश नसतानाही आमदार आशुतोष काळे हे त्यांच्या लहान मुलांसह तुळजाभवानी मंदिरात दाखल झाले तर अभिनेत्री नेहा पेंडसे यांनीही पोलीस बंदोबस्तात दर्शन घेतले. विशेष म्हणजे दर्शन पास काउंटर बंद झालेले असतानाही या मंडळींना VIP दर्शन प्रशासनाने घडवून दिले.

व्हीआयपी दर्शनाबाबत आमदार काळे यांना विचारलं असता त्यांनी याबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर लहान मुलगाहीसोबत नसल्याचं ते म्हणाले. मात्र, त्यांना व्हीआयपी दर्शन दिल्याचं रजिस्टरमध्ये नोंदलं गेलं आहे. (VIP devotees in Tulja Bhavani temple for darshan)

तुळजाभवानी मंदिर आणि इतर मंदिरं सुरू करताना राज्य सरकारने व्हीआयपी दर्शनाची कोणतीही नियमावली दिली नाही आणि तुळजापूर मंदिरात व्हीआयपी दर्शनाचे कोणतेही नियम नसताना बिनदिक्कत हे दर्शन सुरू होतं. अभिनेत्री नेहा पेंडसे यांच्या वाहनाचा ताफा तर थेट मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दाखल झाला.

तुळजाभवानी मंदिरात काही व्हीआयपींनी थेट मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतल्याची बाब मंदिर प्रशासनाने मान्य केली आहे. मंदिरात सामान्य भाविकांची गर्दी असल्याने व्हीआपीनी दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन केलं आहे. पण आमदार लोकप्रतिनिधी यांचं शिफारस पत्र ग्राह्य धरले जात असल्याचा खुलासा करत या कार्य पद्धतीवर मौन राखलं आहे. यासगळ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाविकांनी केली आहे.

इतर बातम्या –

तुळजाभवानी मंदिरात VIP भक्तांचा सुळसुळाट, सामान्य भाविकांच्या रांगा तर आमदार, अभिनेत्रींना थेट दर्शन!

Tuljabhavani Temple | तुळजाभवानी मंदिरात दर्शन पास बंद केल्याने भाविकांचा मंदिर कार्यालयात गोंधळ

(VIP devotees in Tulja Bhavani temple for darshan)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.