व्हायरल वास्तव : शेगावमध्ये सीसीटीव्हीत खरंच भूत कैद?

बुलडाणा : नुकतेच शेगाव येथील वाटिका चौकामध्ये भूत दिसल्याची चर्चा आणि अफवा उडालेली होती. भूत सदृश्य सीसीटीव्हीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे शेगावमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्या संदर्भात टीव्ही 9 मराठीने वृत्त प्रकशित करुन कोणाचातरी खोडसळपणा यामागे असावा असा अंदाज वर्तवला होता. शिवाय ही अंधश्रद्धा असल्याचेही सांगितले होते. याचा पाठपुरावा टीव्ही 9 […]

व्हायरल वास्तव : शेगावमध्ये सीसीटीव्हीत खरंच भूत कैद?
Follow us
| Updated on: May 30, 2019 | 8:54 AM

बुलडाणा : नुकतेच शेगाव येथील वाटिका चौकामध्ये भूत दिसल्याची चर्चा आणि अफवा उडालेली होती. भूत सदृश्य सीसीटीव्हीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे शेगावमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्या संदर्भात टीव्ही 9 मराठीने वृत्त प्रकशित करुन कोणाचातरी खोडसळपणा यामागे असावा असा अंदाज वर्तवला होता. शिवाय ही अंधश्रद्धा असल्याचेही सांगितले होते. याचा पाठपुरावा टीव्ही 9 ने केला असता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते भूत नसल्याचे समोर आलं आहे.  या परिसरात फिरणारा एक वृद्ध व्यक्ती आपल्या हातात पांढऱ्या रंगाचा शर्ट घेऊन फिरत असतो आणि तो अपंग असल्याचेही दुसऱ्या बाजूच्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हे भूत नसून वृद्ध व्यक्ती असलयाचे स्पष्ट झालं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे भूत दिसल्याची चर्चा संपूर्ण राज्यभर पसरली होती. तर यामुळे शेगावात भीतीचे वातावरणही पसरले होते. याचा टीव्ही 9 ने भांडाफोड केला आहे. त्या सीसीटीव्ही व्हिडीओची सत्यता तपासल्यावर समोर आले आहे की, ते भूत नसून त्या परिसरात फिरणारा एक अपंग वृद्ध व्यक्ती आहे. याचा तपास करण्यासाठी टीव्ही 9 ने ज्या ठिकाणी भूत दिसले त्याच्या आजूबाजूला असलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यानंतर त्या दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसून आलं की, एक वृद्ध व्यक्ती रात्रीला लंगडत लंगडत येतो आणि दुकानासमोर अंथरुन टाकून तेथेच झोपतो. त्यामुळे असं सिद्ध होते की भूत दिसला ही अफवा आहे.

ही संपूर्ण घटना दिनांक 13 मे रोजी मध्यरात्रीची असून हा सर्व घटनाक्रम जर का व्यवस्थित बघितला तर 12.16 मिनिटा पासून ते 12.20 मिनिटापर्यंतचा आहे. जो व्हिडीओ व्हायरल झालाय त्या कॅमेरामध्ये फक्त रात्रीच्या वेळी पांढरा रंगाचा शर्टचं दिसला, त्या शर्टला धरुन चालणारा भिकारी दिसलाच नाही. कारण तो तांत्रिक प्रॉब्लेम असावा.  मात्र खरा व्हिडीओ हा दुसऱ्या बाजूच्या सीसीटीव्हीमध्ये समोर आला आहे. त्यात वृद्ध व्यक्ती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असंच आम्ही सांगू शकतो.

पोलिसांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केले भीतीचे काही कारण नसून पोलिसांनी याची पडताळणी केली आहे. त्यामुळे घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.