मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक, बार्शीत तीव्र आंदोलन

दसऱ्यापर्यंत राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकारला दिला आहे.

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक, बार्शीत तीव्र आंदोलन
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 8:49 AM

सोलापूर : दसऱ्यापर्यंत राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकारला दिला आहे. या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी शनिवारी (24 ऑक्टोबर) मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन केलं. मुंबईत मुंबादेवी परिसरात आंदोलन करण्यात आले. (Vishwa Hindu Parishad protest to open temples in Maharashtra)

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बार्शीजवळच्या पानगाव शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस अडवली आणि त्या बसवर मंदिरे खुली करण्याची मागणी करणारा फलक लावला. यावेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत बसचे टायर जाळले. त्यामुळे प्रवाशांना एसटीच्या दुसऱ्या बसेसमधून बार्शी कडे रवाना करण्यात आले. यावेळी प्रवाशांसह परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विश्व हिंदू परिषदेचे विभागीय मंत्री सतीश आरगडे पाटील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेचे समर्थन केले.

पुण्यात मंडईतील शारदा गणपती मंदिरासमोर शंख, ढोल यांचा नाद करत आंदोलन करण्यात आले. येत्या दसऱ्याला सरकारने जर मंदिरे उघडली नाहीत तर भविष्यात विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

“इतर राज्यातील मंदिरं खुली झाली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मंदिरं उघडली नाहीत. राज्यात दारुचे दुकानं सुरु झाले. पण मंदिरं उघडली नाहीत”, अशी टीका आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली. “महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते. हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाले आहे. कोणत्याही निवडणुकीत सगळे छोटे-मोठे पुढारी देवळात दर्शन घेऊनच प्रचार करतात. त्यामुळे किमान आता तरी सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा”, असे आंदोलक म्हणाले.

“दसरा आणि दिवाळीचं महत्त्व हिंदू समाजासाठी मोठे आहे. दसरा-दिवाळीमध्ये देवाला साक्षी ठेवून नवीन वस्तूंची खरेदी हिंदू समाज करत असतो. अशा प्रसंगी देवालये उघडी नसतील, तर हिंदूंचे आर्थिक व्यवहारही कमी होतील. त्यामुळे भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर उघडावी यासाठी आता विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे”, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

संबंधित बातम्या

2 किमी अनवाणी, मात्र खासदार आणि आमदार राणा दाम्पत्याला मंदिरात प्रवेश नाहीच

Navratri 2020 | मंदिरं सुनसान, भाविकांचं बाहेरुनच दर्शन, व्यावसायिकांचं नुकसान

‘दसऱ्यापर्यंत मंदिरं खुली करा, अन्यथा..’, विश्व हिंदू परिषदेचा इशारा

(Vishwa Hindu Parishad protest to open temples in Maharashtra)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.