रिव्हर्स चार्जिंगसह 5000mAh बॅटरी, 9 हजारांच्या रेंजमध्ये Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, सेल लाईव्ह

Vivo Y3s (2021) हा स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

रिव्हर्स चार्जिंगसह 5000mAh बॅटरी, 9 हजारांच्या रेंजमध्ये Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, सेल लाईव्ह
Vivo Y3s 2021
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 7:22 PM

मुंबई : Vivo Y3s (2021) हा स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे, जी रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. हा स्मार्टफोन आकर्षक रंगांसह सादर करण्यात आला आहे. यात ग्रेडियंट बॅक पॅनल फिनिश आहे. (Vivo Y3s 2021 sale live in India, know price and features)

Vivo Y3s (2021) ची किंमत 9490 रुपये आहे, यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज मॉडेल येते. हा स्मार्टफोन पर्ल व्हाईट, मिंट ग्रीन आणि स्ट्रे ब्लू या तीन रंगांमध्ये येतो. हा फोन व्हिवो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट, Amazon , टाटा क्लिक आणि पेटीएम इत्यादी प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Vivo Y3s (2021) चे स्पेसिफिकेशन्स

Vivo चा हा बजेट स्मार्टफोन Android 11 Go Edition आधारित Funtouch 11 OS वर काम करेल. तसेच, यात 6.51 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, जो एलसीडी वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह येतो. तसेच, याचे रिझोल्यूशन 720 × 1,600 पिक्सेल इतके आहे. या फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. अधिक स्टोरेज आवश्यक असल्यास वापरकर्ते 1 टीबी पर्यंत एसडी कार्ड जोडू शकतात.

Vivo Y3s (2021) चा कॅमेरा सेटअप

Vivo Y3S (2021) च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, यात बॅक पॅनलवर एकच कॅमेरा आहे. जो 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये f / 2.2 अपर्चर सेन्सर आहे. तसेच, यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रिव्हर्स चार्जिंगसह दमदार बॅटरी

या विवो स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी सिंगल चार्जवर 19 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग फीचर आहे, ज्याच्या मदतीने इतर फोनही चार्ज करता येतात.

इतर बातम्या

लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ठरलं ! JioPhone Next ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार, जाणून घ्या संभाव्य किंमत, तपशील आणि वैशिष्ट्ये

6000mAh बॅटरीसह येतात ‘हे’ 4 फोन, ज्याची सुरवातीची किंमत आहे 7,299 रुपये

(Vivo Y3s 2021 sale live in India, know price and features)

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....