चित्रपटांचा पुरवठा नसल्याने सिनेमागृहांमध्ये अजूनही अंधारच! मालक, प्रेक्षक, छोट्या व्यावसायिकांना दिलासा कधी?

सिनेमागृह सुरु करण्यासाठी सरकारनं परवानगी दिल्यानंतर सिनेमागृह चालकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांनी डिस्ट्रिब्यूटर्सकडे सिनेमांची मागणीही केली. पण प्रोड्युसर आणि डिस्ट्रिब्युटर्सनी चित्रपट पुरवण्यास असमर्थता दर्शवल्यानं सिनेमागृह बंदच ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे.

चित्रपटांचा पुरवठा नसल्याने सिनेमागृहांमध्ये अजूनही अंधारच! मालक, प्रेक्षक, छोट्या व्यावसायिकांना दिलासा कधी?
सागर जोशी

|

Nov 08, 2020 | 1:01 PM

वर्धा: गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील सिनेमागृह उघडण्यास राज्य सरकारनं अखेर परवानगी दिली आहे. पण चित्रपटच मिळत नसल्यानं सिनेमागृहात अद्यापही अंधार कायम आहे. एखादा ब्लॉकबस्टर सिनेमा असेल वा अगदी नव्याने येणारा, वर्धा शहरातील सिंगल स्क्रिन सिनेमागृहाचा परिसर गजबजलेला असतो. पण राज्य सरकारनं सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी अजूनही इथे शांतताच आहे. (The state government allowed the theaters to start, but the owners faced many difficulties)

सिनेमागृह सुरु करण्यासाठी सरकारनं परवानगी दिल्यानंतर सिनेमागृह चालकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांनी डिस्ट्रिब्यूटर्सकडे सिनेमांची मागणीही केली. पण प्रोड्युसर आणि डिस्ट्रिब्युटर्सनी चित्रपट पुरवण्यास असमर्थता दर्शवल्यानं सिनेमागृह बंदच ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे.

सिनेमागृह मालकांसमोर जुने चित्रपट दाखवण्याचा पर्याय

लॉकडाऊनच्या काळात अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकले गेले. तर या काळात नव्या चित्रपटांची निर्मिती झाली नाही. त्याचाही फटका आता सिनेमागृहाच्या मालकांना बसतोय. अशी माहिती वर्ध्यातील एका सिनेमागृहाच्या मालकांनी सांगितलं. अशा स्थितीत जुने गाजलेले चित्रपट पुन्हा दाखवण्याचा पर्याय सिनेमागृह चालकांसमोर आहे. पण सध्या तरी तो अधांतरीच आहे.

प्रेक्षकांनाही सिनेमागृहे सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर सिनेमागृहांवर अनेक छोटे व्यवसाय अवलंबून आहेत. पण सिनेमागृह बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी सिनेमागृहे लवकर सुरु होऊन त्यांनाही दिलासा मिळण्याची गरज आहे. त्यामुळे सिनेमागृहांबाबत सरकारने निर्णय घेतलेला असला तरी ते सुरु करण्यासाठी आता काय उपाययोजना करण्यात येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रेक्षकांसाठी केंद्र सरकारची नियमावली * चित्रपटगृहाच्या एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्केच जागांवर प्रेक्षकांना मुभा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे उर्वरित जागा रिक्त ठेवाव्या लागणार. * प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे एकमेकांच्या बाजूला बसता येणार नाही. प्रत्येक प्रेक्षकामध्ये एका आसनाचे अंतर राखणे अनिवार्य * रिकाम्या आसनांवर ‘Not to be occupied’ स्टिकर लावणे बंधनकारक. * चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असेल. * चित्रपटगृहात हात धुण्यासाठी आणि हँड सॅनिटायझर्सची व्यवस्था असणे अनिवार्य असेल. * चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना आरोग्य सेतू अॅप वापरण्याचा सल्ला द्यावा. * चित्रपटगृहात येण्यापूर्वी प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग करावे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा.

संबंधित बातम्या:

Unlock | अखेर थिएटर्स उघडणार, 50 टक्के क्षमतेची मर्यादा, सरावासाठी स्वीमिंगपूलही खुले

Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग ‘हे’ नियम वाचाच

PHOTO | Bigg Boss 14 House Tour | पहिल्यांदाच ‘बिग बॉस’च्या घरात रेस्टोरेंट, स्पा, थिएटर, मॉलचा समावेश!

The state government allowed the theaters to start, but the owners faced many difficulties

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें