भारतातल्या या राज्यात जाण्यासाठीही ‘VISA’ ची गरज लागते

केवळ स्थानिकांनाच राज्यात (Nagaland) विनापरवानगी फिरण्याची मुभा आहे. इनर लाईन परमिट (Inner line permit) हा एकप्रकारे व्हिसाच असल्याचा आरोप केला जातोय, जो आता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलाय.

भारतातल्या या राज्यात जाण्यासाठीही 'VISA' ची गरज लागते
Follow us
| Updated on: Jul 24, 2019 | 10:37 PM

नवी दिल्ली : बातमी पाहिल्यानंतर सर्वात अगोदर जम्मू काश्मीरचं नाव मनात आलं असेल. जम्मू काश्मीरमध्ये देशातील कोणताही नागरिक विनापरवानगी जाऊ शकतो. पण नागालँडमध्ये (Nagaland) कोणतीही व्यक्ती इनर लाईन परमिट (Inner line permit) असल्याशिवाय जाऊ शकत नाही. केवळ स्थानिकांनाच राज्यात (Nagaland) विनापरवानगी फिरण्याची मुभा आहे. इनर लाईन परमिट (Inner line permit) हा एकप्रकारे व्हिसाच असल्याचा आरोप केला जातोय, जो आता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलाय.

अगोदर जम्मू काश्मीरमध्येही इनर लाईन परमिटची आवश्यकता होती. पण श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आंदोलनानंतर ही व्यवस्था बंद करण्यात आली. पण नागालँडमध्ये (Nagaland) हा नियम आजही लागू आहे.

भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर संसदेतही हा मुद्दा लावून धरण्यात आला. भारतीय नागरिकांना अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि दीमापूर (नागालँडमधील शहर) वगळता नागालँडमध्ये फिरण्यासाठी इनर लाईन परमिटची आवश्यकता असल्याचं सरकारनेही सांगितलं. दीमापूरसाठीही इनर लाईन परमिट लागू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय, जो विचाराधीन आहे.

काय आहे इनर लाईन परमिट?

देशात सध्या फक्त नागालँडमध्येच इनर लाईन परमिटची व्यवस्था लागू आहे. इस्टर्न फ्रंटियर रिग्युलेशन्स 1873 नुसार या व्यवस्थेने कोणत्याही संरक्षित आणि प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याची मुभा मिळते. नोकरी करण्यासाठी किंवा पर्यटनासाठी गेल्यास इनर लाईन परमिट घेणं अनिवार्य आहे. स्वातंत्र्याअगोदरच्या काळात ब्रिटीशांनी ही व्यवस्था सुरु केल्याचं बोललं जातं.

आज तक डॉट इनने आपल्या वृत्तात म्हटल्यानुसार, ब्रिटीश काळात नागालँडमध्ये औषधी वनस्पतींचं भांडार होतं. या वनस्पती ब्रिटनमध्ये पाठवल्या जायच्या. या वनस्पतींवर दुसऱ्यांची नजर पडू नये यासाठी ब्रिटीशांनी इनर लाईन परमिटची व्यवस्था लागू केली, जेणेकरुन या क्षेत्राचा बाहेरच्या क्षेत्राशी संबंध येणार नाही. नागा आदिवसींच्या कला आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्यानंतरही ही व्यवस्था लागू ठेवण्यात आली.

सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

नागालँडमधील ही व्यवस्था आपल्याच देशात व्हिसा घेण्यासारखी असल्याचं अश्विनी उपाध्याय यांचं म्हणणं आहे. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या कलम 14 (समानता), कलम 15 (भेदभावाला विरोध), कलम 19 (स्वातंत्र्य) आणि कलम 21 (जीवन) याचं उल्लंघन या व्यवस्थेमुळे होत असल्याचा दावा त्यांनी याचिकेतून केलाय. नागा आदिवासींच्या संरक्षणासाठी इनर लाईन परमिटची व्यवस्था करण्यात आली होती. पण नागालँडमध्ये आज 90 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन आहे आणि प्रत्येक गावात चर्च पाहायला मिळतं. सरकारची अधिकृत भाषाही इंग्रजी झाली आहे, असंही उपाध्याय यांनी म्हटलंय. 2 जुलैला उपाध्याय यांनी दाखल केलेली ही याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

नागालँडविषयी महत्त्वाच्या गोष्टी

नागालँडमध्ये फक्त दीमापूर हे क्षेत्र मैदानी भागात येतं, तर बहुतांश पर्वती भाग आहे. विशेष म्हणजे या पर्वती भागातही रेल्वे आणि विमान सेवा उपलब्ध आहेत. दीमापूरचा समावेश अगोदर आसाममध्ये होता, पण नागालँडला मैदानी क्षेत्रासाठी जोडण्यासाठी दीमापूरचा ताबा नागालँडकडे दिला. 1 डिसेंबर 1963 रोजी भारताचं 16 वं राज्य झालेल्या नागालँडची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

नागालँडच्या पूर्वेला म्यानमार, उत्तरेला अरुणाचल प्रदेश, पश्चिमेला आसाम आणि दक्षिणेला मणिपूर आहे. नागालँडला 1957 मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. अगोदर नागा हिल्स तुएनसांग नावाने ओळखल्या जाणाऱ्या नागालँडचा कार्यभारही आसामच्या राज्यपालांकडेच दिला जायचा. पण 1961 मध्ये नागालँड हे नाव स्वीकारण्यात आलं.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.