‘आण्टी किस को बोला?’ स्मृती इराणींचा जान्हवी कपूरला सवाल  

‘आण्टी किस को बोला?' स्मृती इराणींचा जान्हवी कपूरला सवाल  

मुंबई: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्मृती इराणी यांनी इंस्टाग्रामवर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. स्मृती इराणी यांनी या पोस्टला दिलेलं कॅप्शन जास्त चर्चेत आहे. या पोस्टला आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिलं आहे.   स्मृती इराणी आणि […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्मृती इराणी यांनी इंस्टाग्रामवर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. स्मृती इराणी यांनी या पोस्टला दिलेलं कॅप्शन जास्त चर्चेत आहे. या पोस्टला आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिलं आहे.  

स्मृती इराणी आणि जान्हवी कपूर यांची नुकतीच भेट झाली. या भेटीदरम्यान जान्हवीने स्मृतींना आण्टी म्हणून संबोधलं. त्यानंतर जान्हवीने प्रेमाने त्यांची माफीही मागितली. याबाबत स्मृती यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे, यात त्यांनी कॅप्शन दिले,

“कुणीतरी मला गोळी मारावी असा क्षण, जेव्हा जान्हवी कपूरने वारंवार आण्टी म्हटल्यानंतर प्रेमाने माफी मागितली आणि तुम्हाला म्हणावं लागलं – इट्स ओके बेटा, ही आजकालची मुलं…”  #आण्टीकिसकोबोला

स्मृती इराणींची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. स्मृती या त्यांच्या विनोदी पोस्टसाठी सोशल मीडियावर ओळखल्या जातात. त्या नेहमीच अशा विनोदी पोस्ट इन्स्टाग्रामवर करत असतात. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या पती जुबीन इराणींसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता, जो खूप व्हायरल झाला होता.

View this post on Instagram

Some people say my husband’s wife is freaking awesome.. true story ❤️?@iamzfi

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

तसेच त्यांनी दीपिका आणि रणवीर सिंहच्या लग्नाच्या फोटोंच्या प्रतिक्षेत एक फोटो पोस्ट केला होता. जेव्हा तुम्ही दीप-वीरच्या लग्नाच्या फोटोंची खूप काळापासून प्रतिक्षा करत असता. या फोटोला त्यांनी हे कॅप्शन दिले होते. त्यांची ही पोस्टही खूप व्हायरल झाली होती. 

View this post on Instagram

#when you have waited for #deepveer #wedding #pics for too longgggg ?‍♀️

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें