Rishi Kapoor | संतापलेले ऋषी कपूर तेव्हाच म्हणाले होते, माझं निधन होईल, तेव्हा कोणीही मला खांदा देऊ नये!

जेव्हा माझं निधन होईल, माझी मनाची तयारी असलीच पाहिजे. कोणीही मला खांदा देऊ नये. आजच्या तथाकथित स्टार्सचा खूप राग आला आहे' असं ऋषी कपूर यांनी चिडून लिहिलं होतं. (When Rishi Kapoor tweeted angrily about stars skipping Vinod Khanna Funeral)

Rishi Kapoor | संतापलेले ऋषी कपूर तेव्हाच म्हणाले होते, माझं निधन होईल, तेव्हा कोणीही मला खांदा देऊ नये!

मुंबई : बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. नियतीचा अजब खेळ म्हणजे चाहत्यांना भरभरुन प्रेम देणाऱ्या या कलाकाराचं अंत्यदर्शन घेण्याची संधीही कोणाला मिळाली नाही. पण कदाचित ऋषी कपूर यांनीच संतापाच्या भरात काढलेले उद्गार, त्यांच्याबाबतीत खरे ठरले. तेही आजपासून ठीक तीन वर्षांपूर्वी, म्हणजेच त्यांच्या आयुष्यात कॅन्सरने डोकं वरही काढलं नसताना. (When Rishi Kapoor tweeted angrily about stars skipping Vinod Khanna Funeral)

दिवस होता 28 एप्रिल 2017. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांचं 27 एप्रिल 2017 रोजी कर्करोगाने निधन झालं. मात्र विनोद खन्ना यांच्या अंत्यदर्शनासाठी नव्या दमाचा एकही कलाकार उपस्थित राहिला नव्हता. याचा ऋषी कपूर यांना संताप आला होता.

‘अमर अकबर अँथनी’, ‘इना मीना डीका’ आणि ‘चांदनी’ सारख्या चित्रपटात विनोद खन्नाबरोबर ऋषी कपूर यांनी काम केलं होतं. तरुण पिढीचे बॉलिवूड कलाकार स्मशानभूमीत अनुपस्थित राहिल्याने ऋषी कपूर यांच्या मस्तकात तिडीक गेली. त्यांनी या वर्तनाचं वर्णन ‘लज्जास्पद’ असं केलं होतं.

‘लज्जास्पद. विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारात या पिढीतील एकही अभिनेता सहभागी झाला नव्हता. त्यांच्याबरोबर काम केलेलेही (कलाकार) आले नाहीत. आदर करायला शिकले पाहिजे.’ असं ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं.

‘हे का? मी आणि माझ्यानंतरचेही (ज्येष्ठ अभिनेते), जेव्हा माझं निधन होईल, माझी मनाची तयारी असलीच पाहिजे. कोणीही मला खांदा देऊ नये. आजच्या तथाकथित स्टार्सचा खूप राग आला आहे’ असं ऋषी कपूर यांनी चिडून लिहिलं होतं.

दुर्दैवाने लॉकडाऊनच्या काळात ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागतील. कदाचित आता त्यांची तशी मनोकामना नसेलही, पण आपल्या अंत्यविधींना कोणीही उपस्थित राहू नये, अशी क्रोधाच्या भरात व्यक्त केलेली भावना दैवदुर्विलासाने खरी ठरली. (When Rishi Kapoor tweeted angrily about stars skipping Vinod Khanna Funeral)

संबंधित बातम्या :

D Day | चाहत्यांना भरभरुन प्रेम दिलं, मात्र अंत्यदर्शन न देताच दोघांचाही निरोप

Rishi Kapoor | संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा ते देशात आणीबाणी लावा, बिनधास्त ऋषी कपूरांची बेधडक वक्तव्यं

Rishi Kapoor died | पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त, सिनेकलाकारही हळहळले

Rishi Kapoor | बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

Rishi Kapoor | बॉबी ते नगिना, ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

Rishi Kapoor | राजू ते रौफ लाला, अभिनेते ऋषी कपूर यांची तेजस्वी कारकीर्द

PHOTO : ऋषी कपूर यांचे बाल कलाकार ते तारुण्यातले न पाहिलेले फोटो

(When Rishi Kapoor tweeted angrily about stars skipping Vinod Khanna Funeral)

Published On - 12:44 pm, Thu, 30 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI