‘एप्रिल फूल’ची सुरुवात कधीपासून झाली?

मुंबई : ‘एप्रिल फूल’ आता आपल्यासाठी काही नवीन राहिलं नाही. अनेकांना ‘मुर्ख’ बनवून काहीसा आनंद निर्माण करण्यासाठी हा दिवस आता साजरा होऊ लागला आहे. अनेक गमतीजमती या दिवसात होत असतात. त्यामुळे वेगळंच महत्त्व ‘एक एप्रिल’ या दिवसाला आलं आहे. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने ‘एप्रिल फूल’ साजरा केला जातो. पण तुम्हाला या दिवसाची सुरुवात कशी झाली, हे माहीत […]

'एप्रिल फूल'ची सुरुवात कधीपासून झाली?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : ‘एप्रिल फूल’ आता आपल्यासाठी काही नवीन राहिलं नाही. अनेकांना ‘मुर्ख’ बनवून काहीसा आनंद निर्माण करण्यासाठी हा दिवस आता साजरा होऊ लागला आहे. अनेक गमतीजमती या दिवसात होत असतात. त्यामुळे वेगळंच महत्त्व ‘एक एप्रिल’ या दिवसाला आलं आहे. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने ‘एप्रिल फूल’ साजरा केला जातो. पण तुम्हाला या दिवसाची सुरुवात कशी झाली, हे माहीत आहे का?

एप्रिल फुलबद्दल आतापर्यंत अनेक तर्कवितर्क लढवले जातात. इतिहासात एक एप्रिलला अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. ‘एप्रिल फूल’ची सुरुवात 1582 मध्ये फ्रान्समधून झाली आहे. जेव्हा पोप चार्ल्सने जुन्या कॅलेंडरच्याऐवजी रोमन कॅलेंडर सुरु केले होते.

फ्रान्समध्ये काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करतात आणि त्यांना ‘एप्रिल फूल’ म्हटलं जातं. तर काही देशात असाही दावा केला जातो की, 1392 मध्ये ‘एप्रिल फूल’ची सुरुवात झाली. मात्र या दाव्यांना दुजोरा देणारे काही पुरावे सापडले नाहीत.

1508 मध्ये एका फ्रेंच कवीने ‘प्वाइजन डी एव्हरिल’ म्हणजेच एप्रिल फुलचा संदर्भ दिला होता. 1539 मध्ये फ्लेमिश कवी डे डेने यांनी एका गोष्टीत असं लिहिलं होतं की, एका श्रीमंत व्यक्तीने आपल्या सर्व नोकरांना एक एप्रिलच्या दिवशी मुर्खपणाच्या कार्यक्रमाला पाठवले होते, म्हणून हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो.

एप्रिल फूल हा दिवस साजरा करण्याचा देशोदेशीच्या पद्धतीही निरनिराळ्या आहेत. फ्रान्स, इटली, बेल्जियममध्ये कागदाचे मासे बनवून लोकांना चिकटवले जातात आणि त्यांना एकप्रकारे मुर्ख बनवले जाते. इराणी-पारसी नववर्षाच्या 13 व्या दिवशी एकमेकांना मुर्ख बनवत हा दिवस साजरा करतात. डेनमार्कला 1 मे या दिवशी एप्रिल फूल साजरा केला जातो. तसेच स्पॅनिश बोलणाऱ्या देशात हा दिवस 28 डिसेंबरला साजरा केला जातो.

एकंदरीत ‘एप्रिल फूल’ नेमका का साजरा केला जातो, कधीपासून साजरा केला जातो, हे ठामपणे सांगता येत नाही. मात्र, या दिवशी अनेक गमती-जमती घडतात, हे नक्की.

Non Stop LIVE Update
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.