दहशतवादी मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी आली कुठून?

दहशतवादी मसूद अजहरच्या मृत्यूची बातमी आली कुठून?

इस्लामाबाद: पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर अद्यापही जिवंत असल्याचा नवा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. रविवारी संध्याकाळी अजहरच्या मृत्यूवरून पाकिस्तानसह जगभरातून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. मात्र पाकिस्तानी माध्यमांनी मसूद अजहर जिवंत असल्याचं वृत्त दिल्याने, मसूदच्या मृत्यूवरुन संभ्रम कायम आहे. सार्वजनिक कार्यक्रमात खुलेपणानं वावरणारा मसूद एकाएकी गायब झाल्यानंही तो खरंच मेलाय की काय […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:21 PM

इस्लामाबाद: पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर अद्यापही जिवंत असल्याचा नवा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. रविवारी संध्याकाळी अजहरच्या मृत्यूवरून पाकिस्तानसह जगभरातून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. मात्र पाकिस्तानी माध्यमांनी मसूद अजहर जिवंत असल्याचं वृत्त दिल्याने, मसूदच्या मृत्यूवरुन संभ्रम कायम आहे. सार्वजनिक कार्यक्रमात खुलेपणानं वावरणारा मसूद एकाएकी गायब झाल्यानंही तो खरंच मेलाय की काय असं वाटायला संशय आहे. मात्र पाकिस्तानी पत्रकार एजाज सैय्यद यांच्या ट्विटने नवा ट्विस्ट आला आहे.

दहशतवादी मसूज अजहर जिवंत आहे. त्याच्या मृत्यूबाबत पसरवण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. माध्यमं पुन्हा एकदा फेक न्यूजच्या जाळ्यात अडकली, असं ट्विट एजाज सय्यद यांनी केलं.

एकीकडे सोशल मीडियावर मसूदच्या मृत्यूच्या बातम्या व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे जैश म्हणतंय मसूद अजूनही जिवंत आहे, त्यातच पाकिस्तानात मसूदच्या मृत्यूबाबत संभ्रम आहे. पण, जोपर्यंत मसूदच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होत नाही आणि त्याच्या अंतिम संस्काराचे व्हिज्युअल्स येत नाहीत तोपर्यंत तरी मसूद खरंच मेलाय की नाही याबाबत संभ्रम कायम राहील.

जैशचा म्होरक्या खरंच मरण पावला? मसूदच्या मृत्यूची बातमी अचानक कुठून आली? 2000 पासून जैशच्या कारवाया थंडावल्या? अचानक पुलवामात हल्ला केल्यानंतर मसूद कुठे गायब झाला? मसूद खरंच मारला गेला की आजारानं मेला? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.

मसूदच्या मृत्यूच्या बातम्या

पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश ए मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अजहरचा मृत्यू झाल्याच्या बातम्या काल भारत आणि पाकिस्तानी मीडियात प्रसारित झाल्या. काही माधम्यात मसूदचा मृत्यू भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये झाल्याचं म्हटलं तर काही माध्यमात त्याचा मृत्यू किडनी खराब झाल्याने नमूद करण्यात आलं होतं.

मसूद अजहर कोण आहे?

मसूद अजहर हा पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या क्रूर दहशतवादी संघटनेचा संस्थापक होता. पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या बहावालपूर गावात 1968 साली मसूद अजहरचा जन्म झाला. काश्मीरला स्वतंत्र करा, ही मसूदची मागणी होती. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने मसूदला सुरक्षेच्या कारणास्तव नजरकैदेत ठेवलं होतं.

कंधार कांड दरम्यान दहशतवादी मसूद वाचला

1999 मध्ये एअर इंडियाचं विमान आयसी-814 च्या हायजॅकिंग दरम्यान दहशतवादी मसूद भारताच्या हातातून वाचला होता. हायजॅकिंग दरम्यान दहशतवाद्यांनी विमानातील लोकांना सोडण्यासाठी मसूदसह तीन दहशतवाद्यांना सोडा अशी अट ठेवली होती. तेव्हा भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षच्या कारणासाठी मसूदला सोडून दिले. तेव्हापासून हा खतरनाक दहशतवादी भारतासाठी डोके दुखी बनला आहे.

संबंधित बातम्या

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मृत्यू : सूत्र

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें