रात्रीचं पाणी मागितल्याने बायकोने नवऱ्याचे डोके फोडले

पती-पत्नीचे वाद कशावरुन होतील याचा काही नेम नाही. रात्रीच्या सुमारास झोपेतून उठून पाणी मागितल्यामुळे चिडलेल्या बायकोने नवऱ्याच्या (wife attack on husband solapur) डोक्यात कुऱ्हाड घातली.

रात्रीचं पाणी मागितल्याने बायकोने नवऱ्याचे डोके फोडले

सोलापूर : पती-पत्नीचे वाद कशावरुन होतील याचा काही नेम नाही. रात्रीच्या सुमारास झोपेतून उठून पाणी मागितल्यामुळे चिडलेल्या बायकोने नवऱ्याच्या (wife attack on husband solapur) डोक्यात कुऱ्हाड घातली. या हल्ल्यात पतीचे डोके फुटले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे घडली. पत्नीवर पतीच्या तक्रारीवरुन गुन्हा (wife attack on husband solapur) दाखल करण्यात आला आहे.

कोरफळे गावात उजेश ठाकरे हा आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहतो. नेहमीप्रमाणे जेवणकरुन ते घरातील हॉलमध्ये झोपले होते. त्याची पत्नी आशा आणि मुलगी धनश्री या स्वयंपाक खोलीत दाराला कडी लावून झोपल्या होत्या. रात्री दहाच्या सुमारास तहान लागल्यामुळे उजेश ठाकरे जागा झाला. पाणी पिण्यासाठी उजेशने स्वयंपाक खोलीचा दरवाजा वाजवला. त्यामुळे पत्नी जागी झाली.

झोपेतून पाणी पिण्यासाठी उठवल्याने पत्नीने रागात मी पाणी देणार नाही. तुला कुठे जाऊन प्यायचे आहे तिथे जाऊन पी, असं सांगितले. तसेच स्वयंपाक खोलीतील कुऱ्हाड घेत तिने पती उजेशच्या डोक्यात मारली. त्यामुळे उजेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.


Published On - 3:30 pm, Fri, 22 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI