औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात…

शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 15:31 PM, 16 Jan 2021
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात...

औरंगाबादः औरंगाबाद संभाजीनगर वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिलीय. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. (Will Aurangabad Be Renamed Sambhajinagar?; Aditya Thackeray Says)

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेत कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात, पण त्यांनी पाच वर्षे केलं काय.? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. पुढील 6 महिन्यात औरंगाबाद शहर कचरामुक्त होईल, अशी अपेक्षा आहे. औरंगाबादमध्ये कोविड कंट्रोल सेंटर झालंय हे खूप मोठं काम आहे, असंही आदित्य ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात, पण त्यांनी पाच वर्षे केलं काय.? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. भाजप विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करत आहे. त्यांनी त्यांचं काम करावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. देशात भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो कोविडच्या काळातही राजकारण करत होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहराचं नामकरण करण्याच्या मुद्द्यावरून आधीच राजकारण तापलेलं असताना आता भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा बॅनरवॉर सुरु झालं होतं. शिवसेनेच्या (Shiv Sena) सुपर संभाजीनगर या कॅम्पेनविरोधात भाजपने शहरात नमस्ते संभाजीनगरचे ( Sambhaji Nagar) बॅनर लावले होते. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे 16 जानेवारीला औरंगबादच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात या सगळ्या घडामोडी घडत आहेत.

लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे नमस्ते संभाजीनगर
औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरणावरुन सध्या राजकारण तापलेलं आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. तर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने औरंगाबादच्या नामकरणाला जाहीर विरोध केलाय. काँग्रेसच्या या विरोधामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली असताना भाजपने शहरातील लव्ह औरंगाबाद या बोर्डासमोर नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले होते. भाजपच्या याच बॅनरमुळे शहरातील राजकारण आता पुन्हा तापणार असल्याचं सांगितलं जातंय.

संबंधित बातम्या

औरंगाबादेत बॅनरवॉर, लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे ‘नमस्ते संभाजीनगर’

CMO कडून औरंगाबाद शहराचा संभाजीनगर म्हणून उल्लेख, नामांतराचा मुद्दा आणखी पेटणार?

Will Aurangabad Be Renamed Sambhajinagar?; Aditya Thackeray Says