पाकिस्तानचे F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन स्क्वाड्रनमध्ये दाखल

श्रीनगर : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अद्ययावत F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरमधील आपल्या स्क्वाड्रनमध्ये दाखल झाले आहेत. मागील महिन्यात अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांना भारताकडे सोपवण्यात आले होते. दरम्यान, अभिनंदन यांना आरोग्याचा मुद्दा विचारात घेत 4 आठवड्यांच्या सुट्टीवर पाठवण्यात आले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनंदन यांनी आपल्या सुट्टीच्या […]

पाकिस्तानचे F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन स्क्वाड्रनमध्ये दाखल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

श्रीनगर : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अद्ययावत F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरमधील आपल्या स्क्वाड्रनमध्ये दाखल झाले आहेत. मागील महिन्यात अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. त्यानंतर 2 दिवसांनी त्यांना भारताकडे सोपवण्यात आले होते.

दरम्यान, अभिनंदन यांना आरोग्याचा मुद्दा विचारात घेत 4 आठवड्यांच्या सुट्टीवर पाठवण्यात आले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनंदन यांनी आपल्या सुट्टीच्या वेळेत चेन्नईमधील घरी जाण्याऐवजी श्रीनगरमधील स्क्वाड्रनमध्ये थांबण्यास पसंती दिली आहे. विंग कमांडर वर्धमान आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी चेन्नईला जाण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी श्रीनगरला आपल्या स्क्वॉड्रनमध्येच राहण्यास प्राधान्य दिले. आरामासाठीची सुट्टी संपल्यानंतर एक वैद्यकीय पथक अभिनंदन यांची तंदुरुस्ती तपासेल. यात ते पुन्हा युद्धविमान चालक म्हणून कामावर रुजू होऊ शकतात, की नाही याची चाचपणी केली जाईल.

अभिनंदनने स्वतः कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधून भारतात परतल्यानंतर सुरक्षा संस्थांनी अभिनंदनकडून झालेल्या घटनाक्रमाची पूर्ण माहिती घेतली होती. यात जवळजवळ 2 आठवडे गेले होते. त्यानंतरच अभिनंदन यांना आरामासाठी सुट्टीवर पाठवण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.