यवतमाळात रेती व्यावसायिकाची हत्या, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

यवतमाळात रेती व्यावसायिकाची हत्या, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

यवतमाळ : रेती व्यावसायिक सचिन मांगुळकर या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळात घडली. शहरातील राजकीय क्षेत्र, गुन्हेगारी क्षेत्रासह सर्वांशी जवळीक असलेल्या रेती व्यावसायिक सचिन किसन मांगुळकर याची धारधार शास्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन मांगुळकर हा कुख्यात गुंड अक्षय राठोड व त्याच्या टोळीवर लावलेल्या मोक्का केसचा […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

यवतमाळ : रेती व्यावसायिक सचिन मांगुळकर या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळात घडली. शहरातील राजकीय क्षेत्र, गुन्हेगारी क्षेत्रासह सर्वांशी जवळीक असलेल्या रेती व्यावसायिक सचिन किसन मांगुळकर याची धारधार शास्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन मांगुळकर हा कुख्यात गुंड अक्षय राठोड व त्याच्या टोळीवर लावलेल्या मोक्का केसचा फिर्यादी होता. शनिवारी रात्री सचिन मित्रांना भेटायला जात असल्याचं सांगत घरून निघला. मात्र तो घरी परतला तो रक्ताच्या थारोळ्यात.

सचिन मांगुळकरचा भागीदारीत रेतीचा व्यवसाय होता, या व्यवसायात भाजप कार्यकर्ते बाभुळगाव बाजार समिती संचालक सचिन पाटील महल्ले, किरण खडसे, बापू तायडे हे त्याचे सहकारी होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या सर्वांसोबत सचिनचे खटके उडत होते, त्यामुळे यांच्यातील भागीदारी संपुष्टात आली होती. याच वादातून भीमा खाडे या तरुणाशी सचिनची शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर भीमा खाडे, गजानन कुमरे आणि सचिनमध्ये वाद झाला. शनिवारी रात्री घरी परतत असताना चांदोरे नगर परिसरात भीमा खाडे, गजानन कुमरे यांनी सचिनला घेरले आणि धारधार शस्त्राने सचिनवर वार केले. या हल्यात सचिन मांगुळकरचा जागीच मृत्यू झाला.

सचिन मांगुळकरची पत्नी अंजली मांगुळकर यांनी सचिन महल्ले, किरण खडसे, बापू तायडे हे या कटात सहभागी असल्याचा दावा केला. अंजली मांगुळकर यांनी या चौघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सचिन मांगुळकर हा कुख्यात गुंड अक्षय राठोड व त्याच्या टोळीवर लावलेल्या मोक्का केसचा फिर्यादी होता. त्या टोळीने तर सचिनचा काटा  काढला नाही ना, याची पडताळणी आता पोलीस करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें