पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळीला चौथा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. गेल्या एका आठवड्यात पारनेर तालुक्यात चार बिबटे जेरबंद झाले. तर याचं तालुक्यात एक बिबट्याने पिंजऱ्याला चकवा दिला. पिंजऱ्याला चकवा देतानाचा व्हिडीओ ट्रॅप कॅमेरा कैद झाला आहे. दोन डिसेंबरला पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.