Skin Care : चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या? मग ‘हा’ फेस मास्क चेहऱ्याला लावणे फायदेशीर!

फेस मास्क आपल्या चेहऱ्याला लावणे फायदेशीर असते. फेस मास्कमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आपण कलिंगड, मध आणि केळीचे फेस मास्क घरी तयार करू शकतो.

Skin Care : चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या? मग 'हा' फेस मास्क चेहऱ्याला लावणे फायदेशीर!
फेस मास्क

मुंबई : फेस मास्क आपल्या चेहऱ्याला लावणे फायदेशीर असते. फेस मास्कमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आपण कलिंगड, मध आणि केळीचे फेस मास्क घरी तयार करू शकतो. यासाठी आपल्या तीन काप कलिंगड, केळी अर्धी आणि चार चमचे मध लागणार आहे. फेस मास्क तयार करण्यासाठी हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर एक तासांसाठी हे आपल्या चेहऱ्यावर तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. (Applying a face mask on the face is extremely beneficial)

त्वचेवर वयाचा प्रभाव रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर ठेवण्यासाठी तुम्ही जास्वंदाच्या फुलांचा फेस मास्क तयार करू शकता. हा मास्क तयार करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या उकळा. नंतर त्यांना बारीक वाटून घ्या आणि पेस्ट तयार करा. यानंतर त्यात मधाचे काही थेंब घाला आणि नंतर ही पेस्ट चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. काही काळ अशीच राहू द्या. जेव्हा ही पेस्ट सुकते तेव्हा आपले तोंड पाण्याने धुवा. हा फेस मास्क आपल्या चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक आणेल.

हा फेस मास्क आपण साधारण दररोज लावला तरी देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. कट केलेला बटाटा, 2 चमचा दूध, 3-4 थेंब ग्लिसरीन एका वाटीमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा मग हे आपल्या चेहऱ्याला लावा आणि कमीतकमी 15-20 मिनिटे चेहऱ्यावर तसेत ठेवा. जेव्हा ते चांगले सुकेल तेव्हा ते पाण्याने धुवा. टॉवेलने पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा.

नाचणी फेस मास्क तयार करण्यासाठी प्रथम नाचणीची बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर या पावडरमध्ये दूध आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. त्यामध्ये उपस्थित असलेल्या फिनोलिक आम्ल आणि फ्लेव्होनॉइड चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि डीप पोर्स बंद करण्याचे काम करतात. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक लावल्यास तुमची त्वचा चमकदार व मऊ होईल.

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Applying a face mask on the face is extremely beneficial)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI