रात्रभर चेहऱ्यावर लावा कोरफडीचा गर, होतील ‘हे’ फायदे

‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो.

रात्रभर चेहऱ्यावर लावा कोरफडीचा गर, होतील 'हे' फायदे
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 12:59 PM

मुंबई : ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, जर तुम्ही रात्रभर चेहऱ्याला कोरफड लावली तर त्याचे अनेक फायदे आपल्या त्वचेला होऊ शकतात.  (Applying aloevera on the face is beneficial)

रात्रभर चेहऱ्यावर कोरफड लावून ठेवा. यातील पोषण तत्त्वे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. सर्वप्रथम फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर कोरफड जेल चेहरा आणि मानेवर लावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही एसेंशियल ऑइलचाही वापर करू शकता. चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर हे चेहऱ्यावर राहू द्या. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. सोबत मुरुमांचे डाग देखील कमी होतात.

कोरफडीच्या औषधी गुणांमुळे खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडचा वापर केला जातो. जगभरात कोरफडीच्या तब्बल 400हून अधिक प्रजाती आढळतात. परंतु, त्यापैकी केवळ 5 प्रजाती वापरल्या जातात. कोरफडात असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते. ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते. कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते.

कोरफड जेलमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन तर काढतोच आणि त्वचेलाही हायड्रेट ही करतो. यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते. याशिवाय कोरफडाच्या रसात थोडेसे नारळाच्या तेलाचे थेंब घालून ते गुडघे, टाचा आणि हाताच्या कोपराला लावल्यास काळेपणा दूर होतो. कोरफडीचा गर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कोरफडमध्ये व्हिटामिन आणि फायबर गुणधर्म असतात. दररोज कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!

(Applying aloevera on the face is beneficial)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.