Hair Care Tips : केसांसाठी तेल लावणे का महत्त्वाचे?, योग्य मार्ग कोणता ‘हे’ जाणून घ्या!

आपण सर्वांनी लहानपणापासूनच ऐकले असेल की, केसांना तेल लावल्याने आपले केस सुंदर आणि चमकदार राहतात. पण आजकाल फॅशन आणि स्टाईलमुळे लोकांनी केसांना तेल लावणे जवळपास बंद केले आहे. त्याच्या जागी, विविध प्रकारचे सीरम आणि इतर उत्पादने वापरली जातात.

Hair Care Tips : केसांसाठी तेल लावणे का महत्त्वाचे?, योग्य मार्ग कोणता 'हे' जाणून घ्या!
केसांची काळजी

मुंबई : आपण सर्वांनी लहानपणापासूनच ऐकले असेल की, केसांना तेल लावल्याने आपले केस सुंदर आणि चमकदार राहतात. पण आजकाल फॅशन आणि स्टाईलमुळे लोकांनी केसांना तेल लावणे जवळपास बंद केले आहे. त्याच्या जागी, विविध प्रकारचे सीरम आणि इतर उत्पादने वापरली जातात. मात्र, केसांना तेल न लावल्यामुळे आपले केस खराब होऊ लागतात. (Applying oil for beautiful and shiny hair is beneficial)

केसांना तेल लावणे आवश्यक

तुमचे शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी तुम्हाला निरोगी अन्नाची गरज आहे. रोज बाहेर चाट पकोडे खाल्ल्याने तुमचे आरोग्य खराब होते. तसेच केसांचे देखील आहे. केसांचे निरोगी अन्न म्हणजे तेल आहे. यामुळे केसांना पोषण मिळते. केसांना तेल लावल्यामुळे केस लांब, जाड, मजबूत आणि चमकदार होतात.

तेल लावण्याचा हा योग्य मार्ग

केसांची मालिश किमान 10 ते 15 मिनिटे केली पाहिजे. या दरम्यान, टाळूवर तेल चांगले लावावे आणि नेहमी हलक्या हाताने मालिश करावी. जर तुम्ही मालिश करण्यापूर्वी तेल थोडे गरम केले तर ते आणखी चांगले कार्य करते. या व्यतिरिक्त तेल लावल्यानंतर तुम्ही गरम टॉवेलने केस झाकू शकता. यामुळे तेल केसांच्या टाळूपर्यंत चांगले पोहचते.

रात्री तेल लावा

जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावता तेव्हा ते कमीतकमी 10 तास सोडा. अशा परिस्थितीत, आपण यासाठी रात्रीची वेळ निवडणे चांगले. केसांना तेल लावल्यानंतर केसांना रात्रभर तेल राहूद्या. त्यानंतर सकाळी आपले केस थंड किंवा गरम पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Applying oil for beautiful and shiny hair is beneficial)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI