Beauty Tips | जाणून घ्या, नखांना लागलेली मेहंदी झटपट काढण्याचे घरगुती उपाय

जाणून घ्या नखांना लागलेली मेहंदी किंवा चार पाच दिवसांनी जेव्हा मेहंदीचा रंग उतरू लागतो तेव्हा आपण कोणते उपाय करू शकतो

Beauty Tips | जाणून घ्या, नखांना लागलेली मेहंदी झटपट काढण्याचे घरगुती उपाय
Mehndi, नखांना लागलेली मेहंदी झटपट काढण्याचे उपाय
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 1:04 PM

मुंबई : समारंभामध्ये किंवा लग्न कार्यामध्ये हाताला मेहंदी (mehndi) लावून महिला आपल्या सौंदर्यामध्ये भर घालतात. स्त्रियांच्या हातावरती रंगलेल्या मेहंदीमुळे त्याच्या सौंदर्याला चारचाँद लागतात . ज्या महिलेची मेहंदी जास्त रंगलेली असते तिचा पती तिच्यावरती जास्त प्रेम करतो असाही एक समज प्रचिलित आहे. हातावर रंगलेली मेहंदी दिसायला तर सुंदर दिसते, पण जेव्हा हीच मेहंदी नखांना लागते किंवा चार पाच दिवसांनी जेव्हा मेहंदीचा रंग उतरू लागतो तेव्हा मात्र मेहंदीचा नूर कमी झालेला आपल्याला दिसतो. आज या लेखामध्ये आपण नखांना लागलेली मेहंदी कशा प्रकारे काढू शकतो या बद्दल माहिती घेणार आहोत . चला तर मग जाणून घेऊयात घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टीमधून नखांना लागलेली मेहंदी आपण कशा प्रकारे काढू शकतो.

नखांवर लागलेली मेहंदी काढण्याचे 4 सोपे घरगुती उपाय

मीठ सर्वांच्याच घरात सर्रास मिळणारी गोष्ट म्हणजे मीठ, पुरातन काळापासून गोष्टी साफ करण्यासाठी किंवा त्यांची जपणूक करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये मीठ मिसळलेले पाणी घ्या. या पाण्यामध्ये साधारणा 20 मिनीटांसाठी तुमचे हात ठेवा. या गोष्टीमुळे हातवर लागलेले मेहंदीचे डाग कमी होण्यास मदत होईल. यानंतर हाताचा नजूकपणा कायम ठेवण्यासाठी हाताला क्रीम लावा.

ऑलिव्ह ऑईल आणि मीठ आज कालच्या जीवनशैलीमध्ये ऑलिव्ह ऑईला महत्वप्राप्त झाले आहे. जर तुम्ही मेहंदीचे डाग कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हे जादूई गुणधर्म असणारे तेल तुमची नक्की मदत करेल. यासाठी ऑलीव्ह तेलामध्ये मीठ टाकून तयार झालेले हे मिश्रण कापसाच्या मदतीने मेहंदीच्या डागांवर तुम्ही लावू शकता.

लिंबू आणि बेकिंग सोडा लिंबू आणि बेकिंग सोडा या रसाचे खूप फायदे आहेत. लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर करुन आपण घरातील अनेक गोष्टीची सफाई करू शकतो. हे मिश्रण तयाार करण्यासाठी एका लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळा. तयार झालेले हे मिश्रण कापसाच्या मदतीने मेहंदीवरती तुम्ही लावू शकता. साधारण 2 तासांसाठी या मिश्रणाला तुमच्या हातावर तसेच ठेवा आणि काही वेळाने हात स्वच्छ धुवून घ्या. या नंतर हाताला क्रीम लावा यामुळे हाताचा नजूकपणा कायम राहील.

गरम पाणी मेहंदीचे डाग काढण्यासाठी अजून एक सोपा उपाय आहे. हा उपाय म्हणजे गरमपाणी. मेहंदीचे डाग काढण्यासाठी साधारण 20 मिनिटं तुमचे हात गरम पाण्यामध्ये ठेवा यामुळे मेहंदीचे डाग काढण्यास मदत होते.

(कोणताही उपाय वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या )

Mehndi, Beauty Tips, Hand Care, Heena, how to remove henna from hand

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.