केसांपासून ते त्वचेपर्यंत फायदेशीर ठरेल ‘खोबरेल तेल’!

केसांच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. कारण त्यात केसांची चांगली काळजी घेणारे अनेक पोषक घटक असतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:37 AM, 7 Apr 2021
केसांपासून ते त्वचेपर्यंत फायदेशीर ठरेल 'खोबरेल तेल'!
हेअर

मुंबई : केसांच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. कारण त्यात केसांची चांगली काळजी घेणारे अनेक पोषक घटक असतात. नारळ तेलाच्या मालिशच्या फायद्यांविषयी बर्‍याच लोकांना माहिती नाही. चला तर, जाणून घेऊयात नारळ तेल लावण्याचे नेमके फायदे कोणते आहेत? (Coconut oil is beneficial for hair and skin)

-नारळ तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे तेल लावल्याने  कोंडा, कोरडेपणा अशा समस्यांपासून मुक्त करण्यात हे प्रभावी आहे.

-नारळ तेल त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम आणि चांगली होते.

-तुमचे जर ओठ सतत उलत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा.

चेहऱ्यावर मुरूम येत असले तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.

खोबऱ्याचं तेल केवळ केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतं, असं नाही. आपल्या केसांवर कोमट खोबरेल तेल लावा, त्यानंतर डोक्यावर प्लॅस्टिक पिशवी घालून एका टॉवेलनं झाकून घ्या.
नारळ तेल नैसर्गिक, किफायतशीर आणि सहज उपलब्ध होणारे आहे. केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे प्रभावी आहे. अशा परिस्थितीत, अनावश्यक महागड्या हेअर केअर उत्पादनांऐवजी नारळाचे तेल वापरणे अतिशय लाभदायी ठरते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Coconut oil is beneficial for hair and skin)