Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप खराब होऊ द्यायचा नाही?, सुंदर दिसायचंय; मग या टिप्स फक्त तुमच्यासाठीच!

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात घामामुळे मेकअप अनेकदा खराब होतो. मेकअप टिकवणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत मेकअप करण्यापूर्वी काही टिप्स वापरून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप खराब होऊ द्यायचा नाही?, सुंदर दिसायचंय; मग या टिप्स फक्त तुमच्यासाठीच!
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 11:01 AM

उन्हाळ्यात चेहरा चांगला दिसावा तसंच इतंकच नाही तर मेकअप स्वेटप्रुफ (Sweatproof Makeup) रहावा यासाठी काही खास ट्रिक्स करा. या ट्रिक्स तुमचा मेकअप बराज वेळ खराब होऊ देणार नाही. मेकअप या कडक उन्हात ही जसाच्या तसा राहील.मेकअप कोणत्याही चेहऱ्याला सुंदर बनवायचं काम करतो. मेकअपमुळे तुम्ही चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स (Pimples) सुरकुत्या लपवू शकता. पण उन्हाळ्यात मेकअप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात घामाच्या सतत धारा सुरू असतात. अशात मेकअप (Makeup) खराब होवू शकतो. जर तुम्हाला मेकअप करायची सवय आहे. तर तुम्हाला मेकअपसाठी काही खास ट्रिक्स फॉलो करणं गरजेचं आहे. कारण घामामुळे तुमचा मेकअप खराब होऊ नये. पण या टिप्स फॉलो कराल तर, तुमचा मेकअप खराब तर होणार नाहीच. स्वेटप्रुफ (Sweatproof Makeup) ही राहील.

मॉइश्चराइजरचा वापर करा

अनेक लोक उन्हाळ्यात मॉइश्चराइजरचा वापर करत नाहीत. त्यांना वाटंत मॉइश्चराइजरने चेहरा ऑयली होतो. पण, तुमच्या चेहऱ्याला उन्हाळ्यातही मॉइश्चराइजर अत्यंत गरजेचं असतं. पण, उन्हाळ्यात मॉइश्चराइजर वापरताना लाईट मॉइश्चराइजर वापरा. मॉइश्चराइजरच्या वापराने चेहरा हायड्रेट राहतो. वॉटर आणि जेल बेस मॉइश्चराइजर उन्हाळ्याच्या सिझिन मध्ये वापरणं एकदम बेस्ट आहेत.

प्रायमरचा वापर करा

मॉयश्चराइजर चेहऱ्याला लावल्यावर चेहऱ्यावर प्राइमर लावायला विसरू नका. प्रायमर चेहऱ्य़ाचा मेकअप फिक्स करायचं कामं करतं. त्याने तुमचा मेकअप बराच वेळ चांगला राहतो.

हे सुद्धा वाचा

चेहऱ्यावर बेस मेकअप करताना काळजी घ्या

सर्वात जास्त काळजी चेहऱ्यावर बेस मेकअप करताना घेतली पाहिजे. उन्हाळ्यात मेकअप लाइट पातळ लेअरचा बेस असला पाहिजे. त्याने तुमचा मेकअप नॅचरल वाटतो. हेवी बेस ने मेकअप वेगळाच दिसायला लागतो. तसंच घाम आल्याने पोर्स बंद होतात. ज्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सला जास्त त्रास होऊ शकतो.

मस्काऱ्याचा वापर करा

चेहऱ्यावर बेस अप्लाय करून झाल्यावर डोळ्यांचा मेकअप करा. डोळ्यांचा मेकअप करताना सर्व वॉटरप्रुफ प्रोडक्ट्सचा वापर करा. सर्वात आधी मस्कारा लावून घ्या. नंतर त्याने एक किंवा दोन कोट तयार करा. त्यानंतर आयलायनरचा वापर करा. उन्हाळ्यात तुम्ही काजळ लावणं टाळू शकता. कारण काजळं उन्हाने स्मज होते. सर्वांत शेवटी लिपस्टीक लावा.

अजिबात करू नका

घाम आल्यावर चेहरा पुसण्यासाठी टिश्यू किंवा रुमाल वापर. टिश्यु किंवा रुमालाने अलगद घाम पुसा. चेहऱ्यावर अजिबात टिशु किंवा रुमाल घासू नका. त्याने तुमचा मेकअपच नाही तर तुमची स्किन पण खराब होऊ शकते.

(Disclaimer: या लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि ते व्यावसायिक सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाहीत. कोणताही मेकअप करण्याआधी पॅच टेस्ट घ्या. तसंच कोणतेही उपाय करण्याआधी त्याक्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.