Skin Care : दुधाच्या मलईचा स्क्रब चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. पण, महागडी उत्पादने वापरल्यानंतरही काही वेळा चेहरा चमकदार दिसत नाही.

Skin Care : दुधाच्या मलईचा स्क्रब चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
सुंदर त्वचा

मुंबई : त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर केला जातो. पण, महागडी उत्पादने वापरल्यानंतरही काही वेळा चेहरा चमकदार दिसत नाही. उलट बर्‍याच वेळा महागड्या वस्तू आणि मेकअपमुळे चेहऱ्यावर अधिक सुस्तपणा दिसून येतो. कधीकधी या उत्पादनांमुळे त्वचेची आणि चेहऱ्याची हानी देखील होते. यामुळे सुंदर आणि तजेलदार चेहरा पाहिजे. असेल तर आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. (Milk cream scrub is beneficial for the skin)

ज्यामुळे आपला चेहरा कायमच तजेलदार आणि चमकदार बनेल. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, आपण प्रथम त्वचेला एक्सफोलिएट केले पाहिजे. यासाठी तांदळाच्या पिठामध्ये थोडी दुधाची मलई घाला. दोन चमचे तांदळाच्या पिठात दोन चमचे मलई मिसळावी. ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि मग हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. दोन मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. नाक आणि मानेभोवती हलका दाब घेऊन मालिश करा.

जेणेकरून या ठिकाणांवरील घाण आणि मृत त्वचा सहजपणे काढून टाकली जाईल. हे स्क्रब साधारण वीस ते तीस मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. यामुळे आपली त्वचा सुंदर होईल. हा स्क्रब आपण आठ दिवसातून दोनदा केला पाहिजे. हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी दुधावरची साय, गुलाब पाणी, हळद, चंदन पावडर आणि खोबरेल तेल हे साहित्य लागणार आहे. सर्वात प्रथम दुधावरच्या सायमध्ये हळद,गुलाब पाणी, चंदन पावडर आणि खोबरेल तेल मिक्स करा.

ही पेस्ट काही वेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. साधारण वीस मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावू शकतो. आपली त्वचा सतत कोरडी पडत असेल तर आपण चेहऱ्याला दुध देखील लावू शकतो. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. जर आपल्याला चेहऱ्यावरील डाग काढून टाकायचे असतील, तर 1 चमचा चंदन पावडरमध्ये 2 चमचे दूध घालून पेस्ट बनवा.

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Milk cream scrub is beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI