बटाटे आपल्या चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे माहितीये का?; वाचा

बटाटे ही एक भाजी अशी आहे जी बाजारात 12 महिनेही विकली जाते आणि बाजारात मिळते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:11 AM, 7 Mar 2021
बटाटे आपल्या चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे माहितीये का?; वाचा

मुंबई : बटाटे ही एक भाजी अशी आहे जी बाजारात 12 महिनेही विकली जाते आणि बाजारात मिळते. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत बटाटा सर्वांनाच आवडतात. बटाटाचा वापर बहुतेक सर्व भाज्यांमध्ये होतो. यासह, फ्रेंच फ्राईज, बटाटा टिक्की, बर्गर, वडा पाव यासारखे सर्व प्रकारचे स्नॅक्सही बटाटापासून बनवले जातात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? बटाटा आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त उपयुक्त आहे. बटाटाचा चेहऱ्यासाठी मास्क देखील तयार केला जातो. यामुळे त्वचा सुंदर, मुलायम, चेहऱ्यावरील डाग, पिपल्स आणि चेहरा ग्लो देखील होतो. (Potatoes are beneficial for your skin)

फेस मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
1 कट केलेला बटाटा, 2 चमचा दूध, 3-4 थेंब ग्लिसरीन

प्रक्रिया
एका वाटीमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा मग हे आपल्या चेहऱ्याला लावा आणि कमीतकमी 15-20 मिनिटे चेहऱ्यावर तसेत ठेवा. जेव्हा ते चांगले सुकेल तेव्हा ते पाण्याने धुवा. टॉवेलने पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा.

फायदा
ग्लिसरीनचा उपयोग आपली त्वचा मॉइश्चरायझ करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर, बटाटा आपल्या त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकतो. यामुळे चेहरा ग्लो देखील करू लागतो.

-आपल्या चेहर्‍यावरील डाग दूर करण्यात आलू उपयुक्त आहे. आलूमध्ये लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण आपण चेहऱ्याला लावले तर डागांपासून आपली त्वचा मुक्त होईल.

साहित्य
2 चमचा बटाटाचा रस, 2 चमचा काकडीचा रस, 1 चमचा लिंबूचा रस आणि हळद

प्रक्रिया
हे सर्व साहित्य मिक्स करा आणि चेहऱ्यावर चांगले लावा. हे चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारण पंधरा मिनिटे तसेच ठेवा ते कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हे लावले पाहिजे.

फायदा
काकडीचे पाणी आपली त्वचा ग्लो करण्यास मदत करते. बटाटा आपल्या चेहऱ्यावरील छिद्र साफ करते आणि आपल्या चेहऱ्यावरील जादा तेल काढून टाकण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

(Potatoes are beneficial for your skin)