Hair Care : चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी हे हेअर मास्क फायदेशीर, कसे बनवायचे ते जाणून घ्या!

उन्हाळा असो किंवा पावसाळा आपले केस चिकट होतातच. केस चिकट होण्याचे मुख्य कारण म्हणजे घाम आणि ओलावा आहे. कधी-कधी चिकटपणामुळे केसांचा वास देखील येतो. घाम आणि तेलामुळे टाळूला खाज येते. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण वारंवार केस धुतो. मात्र, जास्त रसायनांचा वापर केसांसाठी घातक आहे.

Hair Care : चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी हे हेअर मास्क फायदेशीर, कसे बनवायचे ते जाणून घ्या!
हेअर मास्क

मुंबई : उन्हाळा असो किंवा पावसाळा आपले केस चिकट होतातच. केस चिकट होण्याचे मुख्य कारण म्हणजे घाम आणि ओलावा आहे. कधी-कधी चिकटपणामुळे केसांचा वास देखील येतो. घाम आणि तेलामुळे टाळूला खाज येते. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण वारंवार केस धुतो. मात्र, जास्त रसायनांचा वापर केसांसाठी घातक आहे. वारंवार केस धुतल्यामुळे केस गळतीची समस्या देखील निर्माण होते. (pudina lemon hair mask is beneficial to eliminate the problem of sticky hair)

जर तुम्हाला तुमचे केस रसायनांपासून वाचवायचे असतील तर तुम्ही घरगुती उपाय वापरू शकता. तसेच त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. केसांचा चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही पुदीना आणि लिंबापासून बनवलेले घरगुती उपाय वापरू शकता. यामुळे तुमच्या केसांचा चिकटपणा दूर होतो आणि केसांची वाढही होते. ते कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

पुदिना – लिंबू हेअर मास्क

सामग्री

2 ग्रीन टी

लिंबाचा रस

6 ते 7 पुदिन्याची पाने

आवश्यकतेनुसार पाणी

कृती

-ही पेस्ट बनवण्यासाठी आधी पाणी गरम करा. त्यानंतर पुदिन्याची पाने, ग्रीन टी बॅग उकळा आणि नंतर लिंबाचा रस घाला.

-आता हे मिश्रण गाळून ते वेगळे करा आणि आंघोळीला जातांना केस धुण्यासाठी वापरा.

हेअर मास्क

केसांचा चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या टाळूवर लावा आणि सुमारे 20 मिनिटे सोडा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हे लावल्याने केसांचा चिकटपणा दूर होईल आणि अतिरिक्त तेलही बाहेर येईल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(pudina lemon hair mask is beneficial to eliminate the problem of sticky hair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI