Skin Care Tips : हे खास घरगुती उपाय ट्राय करा आणि त्वचेवरील अ‍ॅलर्जीची समस्या दूर करा!

अनेक मुली आणि स्त्रियांना मेकअप करायला आवडतो. मेकअप आपल्या सौंदर्यात आणखी भर घालण्याचे काम करतो. घराबाहेर पडण्याआधी किंवा कुठेही जाण्यापूर्वी मुली मेकअप करतात. परंतु, आपल्याला माहिती आहे का की, अतिरीक्त मेकअप आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो.

Skin Care Tips : हे खास घरगुती उपाय ट्राय करा आणि त्वचेवरील अ‍ॅलर्जीची समस्या दूर करा!
त्वचा

मुंबई : अनेक मुली आणि स्त्रियांना मेकअप करायला आवडतो. मेकअप आपल्या सौंदर्यात आणखी भर घालण्याचे काम करतो. घराबाहेर पडण्याआधी किंवा कुठेही जाण्यापूर्वी मुली मेकअप करतात. परंतु, आपल्याला माहिती आहे का की, अतिरीक्त मेकअप आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. (Special tips to get rid of skin allergies)

तसेच चुकीच्या उत्पादनाचा वापर केल्याने आपल्या त्वचेला अ‍ॅलर्जीची समस्या देखील होते.  यामुळे त्वचेवर लाल पुरळ, मुरूम आणि काळपटपणा यांचीही समस्या निर्माण होते. जर तुम्हालाही अशा काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्या नक्की घ्या. तसेच त्वचेच्या अ‍ॅलर्जीची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकता.

कडुलिंबाचे तेल

तुम्हाला बाजारात कुठेही कडुलिंबाचे तेल सहज मिळेल. कडुलिंबाचे तेल त्वचेच्या आजारांसाठी खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म आहे. जे त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही रोज नारळाच्या तेलात कडुलिंबाचे तेल मिसळा आणि ते अ‍ॅलर्जी झालेल्या भागावर लावा आणि सुमारे एक तासानंतर ते धुवा.

कोरफड

कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. रोज त्वचेवर लावल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. कोरफडमध्ये असलेले बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात. आपण कोरफडीचे पान तोडून त्यामध्ये असलेला लगदा चेहऱ्यावर लावू शकता. ज्यामुळे चेहऱ्यावर झालेली अ‍ॅलर्जी कमी होण्यास मदत होते.

एरंडेल तेल

एरंडेल तेल त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. तुम्हाला हे कोणत्याही मेडिकल स्टोअर किंवा किराणा दुकानात मिळेल. या तेलात रिसिनॅलिक अॅसिड आढळते. जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे जीवाणूंशी लढण्याचे काम करते. रोज ते लावल्याने अ‍ॅलर्जीची समस्या दूर होते.

मध

मधात सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात. जे त्वचेवर सूक्ष्मजीव वाढू देत नाहीत. जर त्वचेच्या अ‍ॅलर्जीची समस्या असेल तर तुम्ही एक चमचा ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यात मध मिसळू शकता. चांगले मिसळल्यानंतर ही पेस्ट अ‍ॅलर्जी झालेल्या भागावर लावा. ही पेस्ट एक तास राहूद्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Special tips to get rid of skin allergies)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI