Hair Care Tips : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी हे 3 कांद्याचे हेअर मास्क वापरून पाहा!

प्रत्येकाला निरोगी आणि सुंदर केस हवे असतात. यासाठी आपण विविध प्रकारची उत्पादने वापरतो. याशिवाय केस गळणे, अकाली टक्कल पडणे यासह अनेक समस्यांमधून जावे लागते. मात्र, केस गळण्याचे कारण अनुवांशिक देखील असू शकते. या व्यतिरिक्त हे आहारातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते.

Hair Care Tips : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी हे 3 कांद्याचे हेअर मास्क वापरून पाहा!
केसांची काळजी
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 7:55 AM

मुंबई : प्रत्येकाला निरोगी आणि सुंदर केस हवे असतात. यासाठी आपण विविध प्रकारची उत्पादने वापरतो. याशिवाय केस गळणे, अकाली टक्कल पडणे यासह अनेक समस्यांमधून जावे लागते. मात्र, केस गळण्याचे कारण अनुवांशिक देखील असू शकते. या व्यतिरिक्त हे आहारातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा रस अत्यंत फायदेशीर आहे.

काही लोकांना कांद्याचा वास आवडत नाही. पण कांदा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. या व्यतिरिक्त हे अनेक रोगांचा धोका कमी करण्यास देखील मदत करते. जर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही हे 3 कांद्याचे हेअर मास्क लावू शकता. हे हेअर मास्क घरी नेमके कसे तयार करायचे हे आपण बघणार आहोत.

कांद्याचा रस

कांद्याचा रस थेट टाळूवर लावणे फायदेशीर आहे. हे आपले केस मजबूत करण्यास मदत करते. यामुळे तुमच्या टाळूला पोषण मिळते. हे कोलेजन वाढवण्यासाठी देखील मदत करते. तुमच्या केसांची लांबी लक्षात घेता 3 ते 4 कांदे चिरून घ्या आणि त्यांना बारीक करून त्याचा रस काढा. हा रस टाळूवर लावा आणि सुमारे 30 मिनिटे सोडा. त्यानंतर सौम्य शैम्पूने धुवा. केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही हे हेअर मास्क वापरू शकता.

कांदा आणि अंडी हेअर मास्क

अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात. जे केसांच्या वाढीस मदत करतात. हे मिश्रण बनवण्यासाठी अंड्यात कांद्याचा रस चांगला मिसळावा लागतो. हे मिश्रण केसांवर लावा आणि सुमारे 30 मिनिटे सोडा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. अंडी आणि कांदे दोन्ही केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.

कांदा आणि नारळ तेल

केसांची वाढ वाढवण्यासाठी नारळाचे तेल वापरले जात आहे. कांद्याचा रस वापरल्याने केसांना खूप फायदा होतो. तुम्ही कंडिशनर म्हणून खोबरेल तेल वापरू शकता. हे केसांना पोषण करण्यास मदत करते आणि टाळूमध्ये सहज शोषले जाते. यासाठी दोन चमचे कांद्याचा रस दोन चमचे खोबरेल तेलात मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावा आणि सुमारे 30 मिनिटे सोडा आणि नंतर सौम्य शैम्पूने धुवा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This 3 Onion Hair Mask is beneficial for eliminating the problem of hair loss)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.