केसांमुळे मुलींचं सौंदर्यात भर पडते. पूर्वी केसांसाठी घरगुती उपायावर जास्त भर दिला जायचा. मात्र आता जग बदलं आहे. या धावपळीच्या जगात केसांकडे लक्ष देण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत नाही. आणि त्यात बाहेरच्या खाण्याने केसांवर परिणाम होतो. केसांची नैसर्गिक चमक निघून जाते. खास करुन हिवाळ्यात केस कोरडे होतात. त्यामुळे अशावेळी धावपळीच्या जगातून जरा वेळ काढा आणि आयुर्वेदाची मदत घ्या. आयुर्वेदातील काही प्रॉडक्ट्समुळे तुमच्या केसांना नवीन जीवन मिळेल. सगळ्यात महत्त्वाचे या आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सचे साइड इफेक्ट्सही नाही. आणि त्यामुळे तुमच्या केसांचया सौंदर्यात नक्की भर पडले.
कसे मिळणार सुंदर केस
1. हेअर सीरम
आयुर्वेदिक हेअर सीरमला रोजच्या रुटीनचा भाग बनवा. यामुळे केसांचं प्रदूषण आणि सूर्य किरणामुळे होणारे नुकसान टाळता येतं. या सीरममध्ये कोरफड आणि आर्गन ऑयल असतं. ज्यामुळे डॅमेज झालेल्या केसांना फायदा मिळतो.
2. तेल
अनेक मुली केसांना तेलाने मसाज करत नाही. मात्र केसांच्या पोषणसाठी तेल मसाज खूप गरजेचं असतं. आयुर्वेदिक हेअर तेलाने केसांचा मसाज केल्यास त्यांना पोषण मिळतं. आठवड्यातून दोन वेळा या तेलाने मसाज केल्यास केस हेल्दी दिसायला लागतात. तसंच अश्वगंधा तेल तुम्ही रोज लावू शकता.
3. शॅम्पू
आयुर्वेदिक शॅम्पू केसांसाठी सगळ्यात फायदेशीर आहे. या शॅम्पूमध्ये व्हिटामिन इ, ए, डी, सी आणि के आहे. ज्यामुळे या शॅम्पूचा आठवड्यातून 3 वेळा उपयोग केला तर तुमचे केस सुंदर होतील. तसंच या शॅम्पूमध्ये आवळा आणि मेथीचा उपयोग केल्यामुळे याचा केसांना खूप फायदा होतो. केसांना मोठ्या प्रमाणात पोषण मिळतं.
4. हेअर मास्क
आयुर्वेदिक हेअर मास्कचाही केसांचा पोषणसाठी खूप फायदा होतो. हेअर मास्कमुळे तुम्हाला जर कोंड्याची समस्या असेल तर त्यासाठीही मदत होते. तसंच हेअर मास्कमुळे केसांना रक्तपुरवठा चांगला मिळतो. या हेअर मास्कमध्ये भृंगराज आणि कडुलिंब आहे. तसेच कोरफडचाही हेअर मास्क मिळतो. यापैकी कुठलाही हेअर मास्क तुम्ही वापरा सुरुवात केली तर त्यातून तुम्हाला नक्की फायदा होईल.
संबंधित बातम्या :
आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही, या 4 घरगुती उपायांनी Upper Lips Hair पासून मिळवा मुक्ती
Double Chin | हनुवटीखालील अतिरिक्त चरबीने त्रस्त आहात? डबल चिनपासून मुक्तीसाठी 5 उपाय