सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी आहे? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आपल्या चेहऱ्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. विशेष करून चेहरा तेलकट होणे आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणे.

सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी आहे? मग, 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
सुंदर केस

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आपल्या चेहऱ्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. विशेष करून चेहरा तेलकट होणे आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणे. तसेच चेहऱ्यावरील तेलकटपणामुळे आपली त्वचा काळपट पडते. ज्यामुळे त्वचेच्या अधिक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. जर आपल्याला त्वचेच्या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (This face pack is beneficial for getting beautiful and glowing skin)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण घरच्या घरी फेसपॅक तयार करून आपल्या चेहऱ्याला लावले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. घरच्या-घरी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे बेसन पीठ, दोन चमचे गुलाब पाणी, एक चमचा हळद, दोन चमचे ज्वारीचे पीठ लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

हा उपाय आपण आठ दिवसातून दोन वेळा केला पाहिजे. चेहर्‍यावरील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, जो त्वचेसाठी सनस्क्रीन प्रमाणे काम करतो. यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा कुस्कुरून त्यात लिंबाचा रस मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर गोलाकार मोशनमध्ये मसाज करा. कोरफड जेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवरील गडद काळे डाग दूर करण्यास मदत करतात.

चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी ग्रीन टी, गुलाब पाणी आणि चंदन पावडरचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला तीन चमचे थंड झालेली ग्रीन टी, दोन चमचे गुलाब पाणी आणि चार चमचे चंदन पावडर लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक आपण दर आठ दिवसातून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack is beneficial for getting beautiful and glowing skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI