केस कोरडे होणे, तुटणे आणि केस गळण्याची समस्या सतावतेय? मग, ‘हा’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!

केस कोरडे होणे, केस तुटणे, केस गळणे ही खराब झालेल्या केसांची लक्षणे आहेत. महागड्या पार्लर उपचारांवर हजारो रूपये खर्च करण्याऐवजी, तुम्ही केसांसाठी काही नैसर्गिक उपाय करून पाहू शकता.

केस कोरडे होणे, तुटणे आणि केस गळण्याची समस्या सतावतेय? मग, 'हा' हेअर मास्क नक्की ट्राय करा!
सुंदर केस
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 4:49 PM

मुंबई : केस कोरडे होणे, तुटणे, गळणे ही खराब झालेल्या केसांची लक्षणे आहेत. महागड्या पार्लर उपचारांवर हजारो रूपये खर्च करण्याऐवजी, तुम्ही केसांसाठी काही नैसर्गिक उपाय करून पाहू शकता. अॅवकाडो हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. अॅवकाडोमुळे केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. (Use this hair mask to get rid of hair dryness and hair loss problems)

केसांसाठी अॅवकाडो हेअर मास्क अनेक प्रकारे बनवता येतो. अॅवकाडो हेअर मास्क तयार करण्यासाठी एक पिकलेला अॅवकाडो अर्धा कापून घ्या. बिया काढून टाका. काटाच्या मदतीने अॅवकाडो मॅश करा. त्यानंतर यामध्ये काॅफी पावडर आणि खोबरेल तेल मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या केसांना लावा. काही मिनिटांसाठी बोटांनी हलक्या हाताने मालिश करा. शॉवर कॅप घाला आणि टाळूवर एक तास सोडा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

पावसाळ्यात आपण काही हेअर मास्क आपल्या केसांना लावले पाहिजेत. ज्यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पावसाळ्यामध्ये केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपण केसांना ऑलिव्ह ऑइल आणि कॉफी हेअर मास्क लावला पाहिजे. 2 चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळून कॉफी हेअर मास्क तयार करा. हेअर मास्क केसांपासून मुळापर्यंत सर्व केसांवर लावा.

हा हेअर मास्क कमीतकमी 30 मिनिटे सोडा. ते धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा आणि आपण आठवड्यातून एक किंवा दोनदा हा कॉफी हेअर मास्क पुन्हा पुन्हा वापरू शकता. या कॉफी हेअर मास्कमुळे केस गळती कमी होण्यास मदत मिळते. हा हेअर मास्क घरी तयार करण्यासाठी आपल्याला अंडी, दही आणि लिंबू लागणार आहे. यासाठी दोन अंडी, एक वाटी दही आणि चार चमचे लिंबाचा रस लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि केसांना लावा. वीस मिनिटांना केस धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Use this hair mask to get rid of hair dryness and hair loss problems)

Non Stop LIVE Update
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.