ही डिश ठरली 2022ची राजा, दर 1 मिनिटाला 137 लोकांनी केली ऑर्डर – स्विगीचा रिपोर्ट जाहीर

मानसी मांडे,  Tv9 मराठी

|

Updated on: Dec 26, 2022 | 1:23 PM

आपल्यापैकी बरेच जण झोमॅटो, स्विगीवरून बरेच वेळा खाद्यपदार्थ ऑर्डर करत असतात. यंदा म्हणजेच 2022 साली एक डिश सर्वाधिक मागवली गेली. एक पदार्थ लोकांना इतका आवडला आणि तो इतक्या वेळा मागवला गेला की त्या पदार्थाला 2022 सालचा राजा म्हणता येईल.

ही डिश ठरली 2022ची राजा, दर 1 मिनिटाला 137 लोकांनी केली ऑर्डर - स्विगीचा रिपोर्ट जाहीर
Image Credit source: Freepik

नवी दिल्ली – भारतात गेल्या काही वर्षांपासून झोमॅटो, स्विगीसारख्या (swiggy) फूड डिलीव्हरी पार्टनरची डिमांड खूप वाढली आहे. स्विगी कंपनी दरवर्षी एक अहवाल सादर करते, ज्यामध्ये स्विगीवरून कोणता पदार्थ (most ordered food) सर्वात जास्त मागवले जाते याची माहिती असते. यावर्षीही ही यादी जाहीर करण्यात आली असून एक पदार्थ सर्वात जास्त वेळा ऑर्डर करण्यात आला आहे. तो पदार्थ आहे, बिर्याणी (Biryani). होय , 2022  या वर्षीही बिर्याणी सर्वाधिक ऑर्डर करण्यात आली. दर एका मिनिटाला कंपनीला याच्या 137 ऑर्डर्स मिळाल्या. एवढेच नव्हे तर सुमारे 35 लाख ग्राकांनी डिलिव्हरी पार्टनरला टिप दिली, ज्याची किंमत 53 कोटी रुपये इतके आहे.

 बिर्याणी ठरली 2022 सालची फेव्हरिट डिश

या वर्षी प्रत्येक एका मिनिटाला स्विगीला ज्या डिशच्या 137 ऑर्डर मिळाल्या, त्या पदार्थाचे नाव आहे बिर्याणी. गेल्या वर्षी देखील हा पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरला होता, कारण 2021 साली देखील कंपनीला दर मिनिटाला 115 ऑर्डर मिळाल्या होत्या. बिर्याणीनंतर मसाला डोसा हा पदार्थ जास्तीत जास्त ऑर्डर केला गेला. तसेच कोरिअन नूडल्स, सुशी आणि मेक्सिकन खाद्यपदार्थांची मागणीही भारतात वाढल्याचे दिसून आले आहे.

हे सुद्धा वाचा

हा गोड पदार्थ लोकांचा सर्वाधिक आवडता

रिपोर्टनुसार, यावर्षीचा गोड पदार्थांमध्ये लोकांचा आवडता पदार्थ ठरला गुलाबजाम. ग्राहकांनी याच्या किमान 27 लाख ऑर्डर दिल्या. दरवर्षी स्विगीतर्फे गिल्ट फ्री फूड ऑप्शन सर्च करण्यासंदर्भातील माहितीही जाहीर केली जाते. कंपनीच्या सांगण्यानुसार यामध्ये 23 टक्क्यांची वाढ झाली आहे.

स्विगी इंस्टामार्टचीही झाली वाढ

स्विगी आता खाद्यपदार्थांसह ऑनलाइन ग्रोसरीमध्येही शिरले आहे. लोक स्विगी इंस्टामार्ट वरून आता दररोज लागणाऱ्या वस्तूही मागवतात. कंपनीनुसार, यावर्षी चहाच्या ऑर्डरमध्ये यंदा 305 टक्के वाढ झाली तर कॉफी ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांमध्ये 267 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय लोकांनी कांदे, टोमॅटो , केळं आणि इतरही बरेच पदार्थ ऑनलाइन ऑर्डर केले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI