2040 पर्यंत देशात कॅन्सर दुप्पटीने वाढणार

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 15:15 PM, 16 May 2019
2040 पर्यंत देशात कॅन्सर दुप्पटीने वाढणार

मुंबई : बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, हवामान या गोष्टीमुळे भारतात कॅन्सरच्या रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर या कॅन्सरच्या प्रकारामध्ये देशात 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नुकत्याच दी लान्सेट ऑन्कोलॉजी (The Lancet Oncology) यांनी याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे.

दी लान्सेट ऑन्कोलॉजी यांच्या अहवालानुसार, 2018 मध्ये कॅन्सर रुग्णांची संख्या 98 लाख इतकी आहे. मात्र 2040 मध्ये कॅन्सर रुग्णांच्या संख्या 1.5 कोटी इतकी होऊ शकते. तसंच सध्या लहान मुले आणि तरुणांना कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात संभवतो. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 63 टक्के रुग्णांनी किमोथेरेपी केली होते. मात्र सध्याची जीवनशैली, हवामान याचा विचार करता 2040 मध्ये ही संख्या 67 टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया (एचसीएफआय) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सर हा गंभीर आजार आहे. दिवसेंदिवस कॅन्सरची व्यापकता वाढत आहे. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. शहरांपेक्षा ग्रामीण भागात कॅन्सरचे रुग्ण फार कमी आढळतात. ग्रामीण भागात महिलांना प्रामुख्याने गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. तर शहरी भागात स्तन कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. त्याशिवाय गावात किंवा खेड्यापाड्यात पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सरचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. त्या तुलनेत शहरात फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

कॅन्सरच्या या रोगाविषयी सर्वसामान्य जनतेत प्रचंड भिती परसली आहे. कॅन्सरवर उपचारच नाही अशी भावना त्यांनी मनात तयार करून घेतली आहे. तसेच कॅन्सरच्या उपचारासाठी लागणारी औषध, इंजेक्शन या गोष्टी फार महाग आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक दगावतात. अनेकदा कॅन्सर असूनही त्याचे निदान वेळेत न झाल्याने हा कॅन्सरने दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.

कॅन्सर असतो तरी काय?

कॅन्सर या रोगात रुग्णाच्या शरीरात गाठ निर्माण होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला ही गाठ सामान्य फोडाप्रमाणे वाटते. मात्र त्यानंतर याचे रुपांतर ट्युमरमध्ये होते. हा ट्यूमर घातक असतो. कॅन्सर या रोगाला विविध श्रेणीत विभागण्यात आलं आहे.

बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवन, व्यायामाची कमी, अयोग्य आहार या कारणामुळे अनेकांना कॅन्सरला बळी पडावं लागतं.

कॅन्सरपासून बचावाचे काही उपाय

धुम्रपान, मद्यसेवन, पूर्णपणे बंद करा

दररोज स्वच्छ पाणी पिणे

हलकासा व्यायाम करणे.

कमीत कमी ५ प्रकारच्या भाज्या व फळे दररोज

कमी कॅलरीयुक्त आहार घ्यावा