73 वर्षीय आजीचा पोल डान्स पाहा, थक्क व्हाल!

बीजिंग : 60 वर्षांच्या वयात तुम्ही आम्ही काय करत असू? विविध आजारांनी ग्रस्त असू? औषधांच्या आधारे आयुष्याचे शेवटचे दिवस ढकलत असू? माहित नाही. पण सध्या आपण आपल्या आजूबाजूच्या किंवा घरातल्या वृद्ध मंडळीना असंच जगताना बघतो. म्हातारपण आलं की आपलं आयुष्यच संपलं, असं अनेकांना वाटू लागतं. पण प्रत्येक वृद्ध व्यक्ती असाच विचार करते असे नाही. तर …

73 वर्षीय आजीचा पोल डान्स पाहा, थक्क व्हाल!

बीजिंग : 60 वर्षांच्या वयात तुम्ही आम्ही काय करत असू? विविध आजारांनी ग्रस्त असू? औषधांच्या आधारे आयुष्याचे शेवटचे दिवस ढकलत असू? माहित नाही. पण सध्या आपण आपल्या आजूबाजूच्या किंवा घरातल्या वृद्ध मंडळीना असंच जगताना बघतो. म्हातारपण आलं की आपलं आयुष्यच संपलं, असं अनेकांना वाटू लागतं. पण प्रत्येक वृद्ध व्यक्ती असाच विचार करते असे नाही. तर काहींना वृद्धापकाळ म्हणजे पुनर्जन्म वाटतो आणि त्याला ते पूर्णपणे जगू इच्छितात. यापैकीच एक आहेत चीनच्या दाई डाली. यांनी निवृत्तीनंतर आराम करायचे सोडून असे काही केले जे करायच्या आधी तरुणही दोनदा विचार करतील.

चीनमध्ये एका पुस्तकाच्या दुकानात काम करणाऱ्या दाई डाली यांनी 2005 साली आपली नोकरी सोडली. आपण पोल डान्स शिकावा असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी लगेच वेळ वाया न घालता पोल डान्स क्लासेसमध्ये जाण्यास सुरुवात केली. त्यांना पोल डान्सबाबत काहीही माहिती नव्हते. पण त्यांची एक पोल डान्सर होण्याची इच्छा होती. म्हणून त्या 60 वर्षांच्या वयात पोल डान्सर बनल्या.

एका वृत्त वाहिनिशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांना हवेत फिरत डान्स करायला खूप आवडतं. पोल डान्समुळे त्यांचं आयुष्य बदलून गेलं आहे.

आज 73 वर्षांच्या वयात त्या एक प्रोफेशनल पोल डान्सर बनल्या आहेत. प्रशिक्षण घेत असताना त्यांना अनेकदा दुखापतीही झाल्या, कित्येकदा त्यांना अशाही दुखापती झाल्या ज्यामुळे त्यांना आठवडाभर घरी राहावं लागलं. पण त्यांनी शिकण्याची जिद्द सोडली नाही, असेही त्यांनी सांगितले.

तीन वर्षांपूर्वी दाई डाली यांनी ‘आशियाज गॉट टॅलेंट’मध्ये भाग घेतला होता. तिथे सर्वांनी त्यांचं कौतूक केलं. इतक्या वर्षात त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आता त्या एक प्रसिद्ध पोल डान्सर आहेत.

त्यांची अशी इच्छा होती की, त्यांनी पोल डान्सर बनावं आणि जगाला हे दाखवून द्यावं की या वयातही आपण काहीही करु शकतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *