जगातील श्रीमंत व्यक्तींचा दिनक्रम माहित आहे का?

मुंबई : आपण खूप श्रीमंत असावे असे प्रत्येकाला वाटते. आज प्रत्येकजण जास्त पैसे कमवण्यासाठी झटत असतो. सामान्य माणसाचे जीवन हे दिवस-रात्र संघर्षात जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा दिनक्रम कसा असतो? ते किती तास झोपतात, किती वाजता उठतात. हे माहिती करुन घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. इथे आम्ही तुम्हाला अमेझॉनचे संस्थापक …

जगातील श्रीमंत व्यक्तींचा दिनक्रम माहित आहे का?

मुंबई : आपण खूप श्रीमंत असावे असे प्रत्येकाला वाटते. आज प्रत्येकजण जास्त पैसे कमवण्यासाठी झटत असतो. सामान्य माणसाचे जीवन हे दिवस-रात्र संघर्षात जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचा दिनक्रम कसा असतो? ते किती तास झोपतात, किती वाजता उठतात. हे माहिती करुन घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. इथे आम्ही तुम्हाला अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस , मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, प्रसिद्ध निवेशक वॉरेन बफेट आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांचे दिनक्रम कसे असतात याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग पाहूया….

जेफ बेझॉस

जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 137 कोटी डॉलर आहे. बेझॉस यांचा दिनक्रम पाहिला तर, त्यांचा दिवस एका सामान्य माणसासारखाच असतो. व्यवसायातील काही सूत्रांनुसार बेझॉस आठ तास झोपतात आणि सकाळी उठण्यासाठी अलार्म लावतात. त्यांच्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफी आणि वृत्तपत्र वाचत होते. ते अमेझॉनच्या ऑफिसला जाण्याआधी कुटुंबासोबत नाश्ता करतात. सकाळी 10 वाजल्यापासून त्यांच्या मीटिंगला सुरुवात होते. मात्र ते दुपारची वेळ मीटिंग्समधून फ्री ठेवतात. कामनंतर बेझॉस आपल्या कुटुंबियासोबत जेवण करतात. विशेष म्हणजे आपली जेवणाची भांडी ते स्वत: धुतात.

बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स सध्या बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या कामात खूप व्यस्त आहेत. बिल गेट्स सात तास झोपतात. तसेच ते सकाळी नाश्ता करत नाहीत. सकाळी व्यायाम करुन वृत्तपत्र वाचतात. यानंतर ते फाऊंडेशनची कामं करायला सुरुवात करतात. ते खूप जास्त अभ्यास करतात आणि रात्री घरातील काही कामं करायला विसरतही नाही. जेफ बेझॉसप्रमाणे बिल गेट्सही आपली भांडी स्वत: धुतात.

वॉरेन बफेट

दिग्दज गुंतवणूक तज्ज्ञ वॉरेन बफेट आठ तास झोपतात आणि सकाळी 6.45 वाजता उठतात. नाश्ता करण्याआधी ते वृत्तपत्र वाचतात. यानंतर बफे मॅक्डोनाल्ड्समध्ये जातात. तसेच हॅथवेच्या ऑफिसमध्ये जास्त वेळ बफेट वाचन करण्यात घालवतात. ते प्रतिदिन कमीत कमी 500 पेज वाचण्याचा सल्ला देतात. ऑफिसच्या वेळेत ब्रीज खेळणे आणि गिटारचा सराव करु शकतात, असं बफेट आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात.

मार्क झुकरबर्ग

फेसबुकचे संस्थापक किती तास झोपतात हे माहित नसले तरी ते सकाळी 8 वाजता उठतात. उठल्यावर ते सर्वात आधी आपला फोन चेक करतात. विशेष म्हणजे फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवर ते आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा मेहनत घेऊन काम करतात आणि कधी कधी ते त्यांच्या कुत्र्यांसोबत बाहेर फिरायला जातात. सकाळचा नाश्ता  करायला त्यांना जास्त आवडते. तसेच त्यांचा आवडता पोशाख ग्रे टी शर्ट आणि जीन्स आहे. ते आठवड्यात अंदाजे 50 ते 60 तास काम करतात. तसेच आपल्या दोन चिमुकल्या मुलींसोबत ते मजा मस्ती करत आपला दिवस घालवतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *