कर्ज काढताय? बँकेत जाण्याआधी ‘ही’ कागदपत्रं जवळ ठेवा

मुंबई : अलीकडे लोकांना छोट्या छोट्या गरजांसाठी कर्ज काढावं लागतं. घरासाठी, गाडीसाठी, लग्नासाठी किंवा खासगी कर्ज सहज उपलब्धही होते. विशेष म्हणजे कर्ज घेताना तुम्हाला कोणतीही गोष्ट किंवा वस्तू गहाण ठेवावी लागत नाही. तसेच मिळालेल्या कर्जाची रक्कम संबंधित व्यक्ती कशीही खर्च करु शकते. पण बँकेतून कर्ज काढताना काही कागदपत्रे आवश्यकअसतात. ही कागदपत्रे नसतील, तर तुम्हाला कर्ज […]

कर्ज काढताय? बँकेत जाण्याआधी 'ही' कागदपत्रं जवळ ठेवा
या गाईडलाईन्स पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : अलीकडे लोकांना छोट्या छोट्या गरजांसाठी कर्ज काढावं लागतं. घरासाठी, गाडीसाठी, लग्नासाठी किंवा खासगी कर्ज सहज उपलब्धही होते. विशेष म्हणजे कर्ज घेताना तुम्हाला कोणतीही गोष्ट किंवा वस्तू गहाण ठेवावी लागत नाही. तसेच मिळालेल्या कर्जाची रक्कम संबंधित व्यक्ती कशीही खर्च करु शकते. पण बँकेतून कर्ज काढताना काही कागदपत्रे आवश्यकअसतात. ही कागदपत्रे नसतील, तर तुम्हाला कर्ज काढण्यास अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने सही केलेला अर्ज
  • ओळखपत्र : पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्राईव्हिंग लायसन्स, आधारकार्ड
  • निवासस्थानाची ओळखपत्रे : पासपोर्ट, ड्राईव्हिंग लाईसन्स, मतदान कार्ड, वीजेचे किंवा टेलिफोनचे बील, 3 महिन्यांचे बँक स्टेंटमेंट आवश्यक असते. विशेष म्हणजे बँकेला दिली जाणारी कागदपत्रे मागील 3 महिन्यांमधील असावीत.
  • वयाचा दाखला – पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्माचा दाखला, सरकारी कर्मचारी असल्याचे ओळखपत्र
  • उत्पन्नाचा दाखला – कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची 6 महिन्यांची सॅलरी स्लिप, तसेच 6 महिन्यांचे बँक अकाऊंट स्टेटमेंट, गेल्या 2 वर्षातील आयटी रिटर्न्सचा अर्ज क्रमांक 16 असणेही आवश्यक.

त्याशिवाय बँक किंवा एनबीएफसी (Non Banking Financial Company) या फक्त कर्ज परत करणाऱ्या आणि विश्वासू व्यक्तीलाच कर्ज देतात. त्यामुळे तुम्ही जर कर्जासाठी अर्ज केला असेल आणि तो मंजूर व्हावा असे तुम्हाला वाटतं असेल तर, त्यात तुमच्या जोडीदाराचा (नवरा/बायको) तपशीलही जोडा. यामुळे तुमच्या अर्जात उत्पन्नाची रक्कम वाढेल आणि तुम्हाला कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

तुम्ही याआधी कोणते कर्ज काढले असेल, तर त्याची आधी परतफेड करा आणि त्यानंतरच नवीन कर्जाबाबत प्रक्रिया सुरु करा. त्याशिवाय कर्ज काढण्याआधी तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच तुमचा क्रेडिट स्कोर कमी असल्यास कर्जासाठी इतर एनबीएफसी बँकेला तुम्ही संपर्क करु शकता.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.