हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ही फळं खा

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By: SEO Team Veegam

Updated on: Feb 15, 2020 | 6:11 PM

नेहमी फळांचा ज्युस प्यायलाने शरीरासाठी चांगले असते. दररोज फळं किंवा ज्युस प्यायलाने शरिरातील रक्त वाढते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्याशिवाय आपली पचनशक्तीही सुधारते. आज आम्ही तुम्हाला व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असलेली काही फळं सांगणार आहोत. ज्या फळांमुळे थंडीच्या दिवसांत तुम्ही फिट राहू शकता, तसेच पोटांच्या आजारांपासूनही मुक्त राहू शकता आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला लाभदायक […]

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ही फळं खा

नेहमी फळांचा ज्युस प्यायलाने शरीरासाठी चांगले असते. दररोज फळं किंवा ज्युस प्यायलाने शरिरातील रक्त वाढते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्याशिवाय आपली पचनशक्तीही सुधारते. आज आम्ही तुम्हाला व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असलेली काही फळं सांगणार आहोत. ज्या फळांमुळे थंडीच्या दिवसांत तुम्ही फिट राहू शकता, तसेच पोटांच्या आजारांपासूनही मुक्त राहू शकता आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला लाभदायक ठरू शकतात.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर संत्र्याचा ज्युस प्या. संत्र्याच्या ज्युसमध्ये जास्त कॅलरी असतात, जर तुम्ही दररोज संत्रे खाल्ले तर एका वर्षात तुम्ही 19 हजारपेक्षा जास्त कॅलरी वाचवू शकता. तसेच संत्र्याच्या ज्युसपेक्षा संत्रं खाल्ले तर अधिक लाभदायक असते.

द्राक्षामध्ये व्हिटॅमीन सी सोबत फायबरही असते. द्राक्षही वजन घटवण्यात उपयेगी आहे. तुमच्या आहारात दररोज द्राक्ष खाल्ले तर आठवड्यांत तुमचे वजन कमी होईल आणि फरकही जाणवेल.

दररोज नाश्ताच्या एवजी जर सफरचंद खाल्ले तर तुमचे वजन आणि आरोग्यही उत्तम राहील. सफरचंद हा फळांमधील डॉक्टर म्हणूनही ओळखला जातो. यामध्ये कॅलरी कमी असते तसेच फायबर आणि व्हिटॅमीन जास्त प्रमाणात असते. जे तुम्हाला फिट राहण्यात खूप मदत करते.

एवकाडोमध्ये ओमेगा 9 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. फॅटचे उर्जामध्ये बदल करण्याचे काम करत असते. तसेच मेटाबॉलिज्मलाही मजबूत करते. याशिवाय औमेगा 9 फॅटी अॅसिड ऑलिव्ह ऑईल आणि नट्समध्येही असते.

नारळामध्ये फायबर आणि व्हिटॅमीन ए,बी,सी, आणि खनिज जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे वजन वाढलेल्या लोकांसाठी ते उपयोगी ठरते. यामध्ये कॅलेस्ट्रोल नसते तसेच खोबरं खाल्ल्याने पचनशक्ती ठिक राहते आणि शरिराला उर्जा मिळते.

अननसमध्ये फॅट आणि कॅलेस्ट्रोल नसते. यामध्ये सर्व उपयुक्त व्हिटॅमीन आणि तत्व आहेत ज्यामुळे शरिराला पोषण मिळते. जसे की, व्हिटॅमीन, फायबर, मिनरलसोबत अँटिऑक्सिडेंट असते ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. अननसमध्ये 85 टक्के पाणी असते. ज्यामुळे खूप वेळा पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक नाही लागत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI