Hair Care | केसांमध्ये कोंड्याची समस्या? पाहा ‘हे’ सर्वोत्तम नैसर्गिक उपाय

सांत कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु, जर आपण ही समस्या वेळेत सोडवली नाही तर, ती कायम स्वरूपी त्रासदायक ठरू शकते.

Hair Care | केसांमध्ये कोंड्याची समस्या? पाहा 'हे' सर्वोत्तम नैसर्गिक उपाय
कोंडा
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 9:44 AM

मुंबई : केसांत कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु, जर आपण ही समस्या वेळेत सोडवली नाही तर, ती कायम स्वरूपी त्रासदायक ठरू शकते. डोक्यातील कोंड्यामुळे फक्त आपले केस खराब नाहीत. तर, त्यासोबतच आपल्या चेहर्‍यावर, पाठीवर, खांद्यावरही बर्‍याच समस्या वाढतात. कोंड्याच्या समस्येमुळे तुमच्या नखांमध्येही बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.  (Follow these tips to get rid of dandruff)

-कोंडा त्वचा आणि नखांसाठी देखील हानिकारक आहे. म्हणून, केस वेळेवर स्वच्छ करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आम्ही आपल्याला एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण नैसर्गिकरित्या डोक्यातील कोंड्याच्या समस्येतून मुक्त होऊ शकता…

-कोंड्याची समस्या मिटवण्यासाठी लिंबू आणि नारळ तेल उपयोगी ठरते. यासाठी आपल्याला 2-3 चमचे नारळ तेल आणि एका लिंबाची आवश्यकता आहे. प्रथम एका वाडग्यात 2 ते 3 चमचे नारळाचे तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. जेव्हा दोन्ही घटक चांगले मिसळले जातील, तेव्हा हे मिश्रण कॉटन बॉलच्या सहाय्याने केसांच्या मुळांवर लावा.

-केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी, केस स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर केला जातो. यामुळे टाळूच्या त्वचेवर जमा झालेली दुर्गंधी आणि अतिरिक्त तेल स्वच्छ होण्यास मदत मिळते. शॅम्पूचा आवश्यकतेपेक्षाही अधिक उपयोग केल्यास केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

-उदाहरणार्थ केस निर्जीव, निस्तेज, कोरडे, पातळ होणे. दुभंगलेल्या केसांची समस्या निर्माण होणे. केसांवरील नैसर्गिक चमक नाहीशी होणे. तर काही लोकांना मोठ्या प्रमाणात केसगळतीच्या समस्येचाही सामना करावा लागतो. यामुळे शॅम्पूचा अति वापर करणं टाळा.

-केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी कडुनिंबाची पानेही चांगली काम करतात. यासाठी कडूलिंबाची पाने उकळवून घ्या आणि त्याचे पाणी केसांच्या मुळांवर लावा. किमान एक तास असेच सोडा. यानंतर थंड पाण्याने केस धुवा.

-दही केसांना पोषण देते आणि केसांतील कोंडाच्या समस्येपासून मुक्तता मिळते. यासाठी आंबट दह्यामध्ये एक चमचा मिरपूड पावडर मिसळा आणि हे मिश्रण केसांवर सुमारे एक तास ठेवा. यानंतर पाण्याने केस धुवा. आठवड्यातून किमान एकदा तरी हा उपाय करा. यामुळे केस सुधारतील आणि केसातील कोंडाही काही दिवसांत नाहीसा होईल.

संबंधित बातम्या : 

(Follow these tips to get rid of dandruff)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.