‘डेड स्किन’च्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ नक्की ट्राय करा..

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो.

'डेड स्किन'च्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग 'हे' नक्की ट्राय करा..
फेसपॅक
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:23 AM

मुंबई : उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्वचा तेलकट, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. आपल्या त्वचेला हवामानाशी जुळवून घेण्याची संधी द्या. उन्हाळ्याच्या हंगामात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यायची याबद्दल आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Follow these tips to get rid of dead skin)

-तांदळाचे जाडसर पीठ तयार करण्यासाठी चार ते पाच चमचे तांदूळ घ्या आणि जाडसर वाटा.  या पेस्टमध्ये दूध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर स्क्रब प्रमाणे लावा. चेहऱ्यासोबत मानेवरही लावा. हलक्या हाताने गोलाकार दिशेमध्ये तीन ते चार मिनिटांसाठी त्वचेचा मसाज करावा. पेस्ट पूर्णपणे सुकू द्यावी. यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

-तांदळामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन-डी, फायबरसह अन्य पोषण तत्त्वांचा मात्रा भरपूर असते. याव्यतिरिक्त तांदळामध्ये लोह आणि थायमीन यासारख्या तत्त्वांचाही समावेश आहे. यामुळेच तांदळाचे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. तांदळाच्या पिठामुळे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवरील दुर्गंध स्वच्छ होण्यास मदत मिळते.

-तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काहीवेळाने धुवून टाका.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Follow these tips to get rid of dead skin)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.