तुमचा जोडीदार रागवला आहे…तुमच्यामध्ये पूर्वीसारखं नातं जाणवत नाहीय ? मग ‘या’ गोष्टी करा

तुमचा जोडीदार रागवला आहे...तुमच्यामध्ये पूर्वीसारखं नातं जाणवत नाहीय ? मग 'या' गोष्टी करा
प्रातिनिधिक फोटो

प्रियकर-प्रेयसी असो वा नवरा बायको नवीन नातं असलं की सगळं छान छान वाटतं...जसं जसं नातं पुढे जातं काही वर्षांनी नात्यामध्ये पहिलेसारखा ओलावा जाणवत नाही. मग विचार पडतो असं का, त्याचंच उत्तर आज आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Dec 27, 2021 | 5:28 PM

 relationship : नात्यात कायम एक प्रकारचा गोडवा असावा…आणि हा गोडवा असा राहिले हे आपल्या हातात असतं. नातं जेव्हा नवीन नवीन असतं तेव्हा सगळं व्यवस्थित असतं. आपण एकमेकांना वेळ देतो. पण जसं हे नातं अनेक वर्षांमध्ये पुढे जातं. त्यात पहिलेसारखं काही असं जाणवायला लागतं नाही. या मागे अनेक कारणं असू शकतात. पण काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवला आणि त्या केला तर हे नातं कायम नवीन वाटेल. त्या नात्यात ओलावा वाटेल.

क्वालिटी टाइम

कुठल्याही नात्यामध्ये क्वालिटी टाइम देणं खूप गरजेचं असतं. स्पर्धेच्या युगात आज नवरा बायको असो प्रियकर-प्रियसी असो नोकरी करतात. त्यामुळे त्यांना एकमेकांना देण्यासाठी वेळ मिळत नाही. मग अशावेळी त्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येतो. म्हणून एकमेकांना क्वालिटी टाइम द्या. बाहेर फिरायला जा. एखाद्या छान हॉटेलमध्ये जेवायला जा. तिथे एकमेकांना वेळ द्या. एकमेकांचं बोलणं ऐकून घ्या. अगदी शक्य असेल तर मस्तपैकी काही दिवसांसाठी ट्रीपवर जा.

पार्टनरला कसं खूष करणार

छोट्या छोट्या गोष्टीत नात्याचं सुख दडलेलं असतं. शक्य तेव्हा पाटर्नरची तारीफ करा. कुठल्या पाटर्नरला आवडतं नाही आपली तारीफ झालेली आणि ती जर आपल्या पाटर्नरने केली असेल तर सोने पे सुहागा. कधी-कधी पार्टनरला कॉम्पलीमेंट द्या. यामुळे नात्यांमध्ये गोडवा राहतो.

कधी कधी पार्टनला गिफ्ट द्या

गिफ्ट…हे तर कोणाला आवडतं नाही..त्यात कारण नसताना सरप्राइज गिफ्ट मिळालं तर क्या बात है. गिफ्ट खूप महाग असावं असं बिलकुल नाही. फक्त त्यात प्रेम असावं…अगदी गजराही नेला तरी बायकोच्या घरावरील स्माईल आपल्या दिवसभरातील सगळे टेन्शन दूर करतील. आणि तुम्ही पण आपल्या नवऱ्यासाठी छान त्यांचा आवडीचं जेवण बनवा. या छोट्या छोट्या गोष्टीतून तुमच्या नात्यात प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी कायम राहिल.

एकमेकांना स्पेस द्या

हो आजकाल सगळ्यांना आपली अशी एक स्पेस लागते. आणि ती देणे गरजेचं आहे. प्रत्येक जणांचा आपली एक विचार करण्याची पद्धत असते आणि आपल्या प्रकारे जगण्याची इच्छा असते. म्हणून सतत एकमेकांना टोकू नका. त्यामुळे नात्यात दुरावा येतो. प्रत्येक वेळी त्यांचा मोबाईल पाहणे, सतत प्रत्येक गोष्ट विचारणे हे नात्यात नसावं. प्रत्येकांचं आपलं फ्रेंड सर्कल असतं, त्यांचासोबत वेळ गेल्यास त्यात वाईट वाटून घेऊ नका. दोघेही एकमेकांना स्पेस द्या आणि नात्यात आनंद ठेवा.

इतर बातम्या :

डाएट, जिम आणि व्यायाम करूनही वजनाचा काटा खालीच येत नाही? आहारात 5 हर्बल पेयाचा समावेश करा अन् परिणाम पहा!

लाल केळी कधी खाली आहेत का? फायदे कळल्यास रोज खाणार लाल केळी

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेतल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता तर दूर होतेच पण ‘हे’ आजारही दूर होतात, वाचा सविस्तर!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें