तब्बल 26 हजारांची जीन्स आहे तरी कशी?

मुंबई : जीन्स, कपड्यांमधील हा एक असा प्रकार आहे जो आज तरुणांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. पाश्चात्य देशातून भारतात आलेला हा पोषाख आज भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. आज भारतातील तरुण मोठ्या प्रमाणात जीन्सचा वापर करतात. आपल्या लाईफस्टाईलचा तो एक भाग बनला आहे. जीन्सच्या जन्मापासून ते आजवर त्यामध्ये खूप बदल झाले. दिवसेंदिवस त्याची फॅशन …

तब्बल 26 हजारांची जीन्स आहे तरी कशी?

मुंबई : जीन्स, कपड्यांमधील हा एक असा प्रकार आहे जो आज तरुणांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. पाश्चात्य देशातून भारतात आलेला हा पोषाख आज भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. आज भारतातील तरुण मोठ्या प्रमाणात जीन्सचा वापर करतात. आपल्या लाईफस्टाईलचा तो एक भाग बनला आहे.

जीन्सच्या जन्मापासून ते आजवर त्यामध्ये खूप बदल झाले. दिवसेंदिवस त्याची फॅशन बदलत गेली. मात्र कधी कधी फॅशनच्या नावावर असं काहीतरी बाजारात येतं, जे बघून ‘काय विचार करुन ते बनवण्यात आलं असावं’, असा प्रश्न मनात उठतो. 2018 मध्ये एक अशी जीन्स व्हायरल झाली होती, ज्यामध्ये फक्त खिसे आणि झिप होती. याशिवाय पाय झाकायला कुठल्याही प्रकारचा कपडा त्या जीन्समध्ये नव्हता. ही जीन्स इतकी व्हायरल झाली होती की, काहीचं तासात 11 हजाराहून अधिक किंमत असलेली ही जीन्स विकली गेली. आता 2019 मध्ये याउलट एक फॅशन असलेली जीन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


ही जीन्स युक्रेनचे फॅशन डिझायनर कसेनिया शनाइडर (Ksenia Schnaider) यांच्या प्री-फॉल 2019 या कलेक्शनमधील आहे. या जीन्सला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. कारण या विचित्र जीन्सचा एक पाय स्ट्रेट तर दुसरा पाय वाईड फ्लेअर स्टाईलचा आहे. आता लोकांना हे कळत नाहीये की नेमका हा प्रकार काय आहे.

जर तुम्हाला ही जीन्स खरेदी करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला 290 युरो म्हणजे 26 हजार 537 रुपये इतकी किंमत मोजावी लागेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *