जुन्या कपड्यांवर रंगपंचमी खेळाची नाही… तर हा हटके लूक ट्राय करा

जुन्या कपड्यांवर रंगपंचमी खेळाची नाही... तर हा हटके लूक ट्राय करा
clothes

जुने कपडे घालून रंगपंचमी खेळण्याचे दिवस आता गेले आहेत. आजच्या काळात, अनेक जण रंगपंचमीच्या दिवशी खास ‘ट्रेंडी लूक’ला प्राधान्य देत असतात. स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी अनेकांकडून आपल्या लूकवर अधिक लक्ष देण्यात येत असते.

मृणाल पाटील

|

Mar 17, 2022 | 11:32 AM

मुंबई : लहानपणी रंगपंचमीचे दिवस आठवल्यावर एक गोष्ट नक्की आठवते. रंगपंचमी आली की, घरातील जुन्या कपड्यांचा (Old Clothes)शोध घेतला जात असे. रंगपंचमी खेळाची असली तरी कपडेही खराब व्हायला नको, म्हणून अनेक जण जुने कपडे घालूनच रंगपंचमी साजरी करत असत. पण आजच्या काळात हा ट्रेंड (Trends) बदलला आहे. अपार्टमेंट आणि सोसायटीमध्ये राहणारे लोक आता रंगपंचमीसाठी खास कार्यक्रम तयार करतात. अनेक ठिकाणी ड्रेसकोडही बनवला जातो. ड्रेसकोड नसला तरी या निमित्ताने प्रत्येकजण एकापेक्षा एक भारी ड्रेसेस घालून रंगपंचमी (Holi) खेळायला येतात. तुम्हालाही जुना ट्रेंड सोडून नवीन ट्रेंड फॉलो करायचा असेल, तर या लेखातील काही टीप्स्‌ तुमच्या नक्की उपयोगी येतील.

सर्वात स्टायलिश लूकसाठी 

जर तुम्हाला होळीच्या दिवशी स्वत:ला स्टायलिश लूक द्यायचा असेल, तर यावेळी जंपसूट वापरू शकता. त्यासोबत तुम्ही एम्ब्रॉयडरी केलेले हाफ जॅकेट घालू शकता. याशिवाय पांढऱ्या टी-शर्टसोबत डेनिम शॉर्ट्सही घालता येतात. यामुळे तुम्ही स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल.

एथनिक लूक मिळवा

एथनिक लूक मिळवायचा असेल तर पांढऱ्या पोशाखावर रंगीबेरंगी दुपट्टा घाला. पांढऱ्या रंगाचे कपडे होळीला मस्त लुक देतात. चिकनकारी, सलवार कमीज आणि शरारा, पांढऱ्या रंगाची साडीही परिधान करु शकता. याशिवाय, तुम्ही कलरफुल लॉग स्कर्टसोबत पांढरा टॉप कॅरी करू शकता. या आउटफिट्समध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि रंगपंचमीला तुम्ही कुणापेक्षा कमी दिसणार नाही.

पुरुषांसाठी ग्राफिक टीशर्ट

रंगपंचमीला पुरुष ग्राफिक टी-शर्ट घालू शकतात. आजकाल ते ट्रेंडमध्ये आहेत. याशिवाय पांढरा किंवा कोणत्याही हलक्या शेडचा कुर्ताही जीन्ससोबत चांगला दिसेल. अशा प्रसंगी कुर्ता पायजमाही मस्त दिसतो. तुम्ही त्यासोबत गॉगल्सचाही वापर करु शकतात. ते स्टायलिश देखील दिसेल. याने रंगांपासून तुमच्या डोळ्यांचे रक्षणदेखील होईल.

शूजची निवड देखील महत्वाची

होळीच्या पार्टीत आउटफिटची निवड जितकी महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची शूजचीही असते. त्यामुळे आरामदायी आणि घसरण्याची शक्यता नसलेली पादत्राणे निवडावी. स्टाईलची आवड म्हणून होळी खेळताना लांब टाचेची पादत्राणे घालणे टाळावे.

केसांवर विशेष लक्ष द्यावे

होळीच्या रंगांमुळे तुमच्या केसांचेही नुकसान होते, त्यामुळे त्यांना उघडे ठेवणे योग्य नाही. या प्रसंगी केसांचा अंबाडा किंवा लांब वेणी ठेवल्यास अधिक चांगले होईल. पुरुषही त्यांना हवे असल्यास टोपी घालू शकतात.

संबंधीत बातम्या :

मुंबई High Court महाजन, व्यास यांचे जप्त केलेले 12 लाख वृद्धाश्रम, अनाथाश्रमांना देणार, नेमकं प्रकरण काय?

AAP Punjab Govt: आप पंजाबमधून हरभजन सिंगला राज्यसभेवर पाठवणार?

IPL 2022: धोनी 7 नंबरची जर्सी का वापरतो? त्यानेच सांगितलं यामागचं रहस्य, पहा VIDEO


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें