कोरोनापासून दूर राहण्यासाठी सकाळचा नाश्ता महत्वाचा, वाचा याबद्दल अधिक !

सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण आहारात काय घेतो हे अतिशय महत्वाचे आहे.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सकाळचा नाश्ता महत्वाचा, वाचा याबद्दल अधिक !
नाश्ता
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 7:02 AM

मुंबई : सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण आहारात काय घेतो हे अतिशय महत्वाचे आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर आपण हेल्दी नाश्त्या घेतला पाहिजे. जर आपण नाश्त्यामध्ये भाजीपाला, फळे, धान्य, प्रथिने, कार्बोदके घेतली तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. कारण या पदार्थांचा आहारात समावेश केला तर आपणी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल . (It is beneficial to have breakfast in the morning)

तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, सकाळी लवकर न्याहारी केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात. सकाळचा नाश्ता टाळला तर मायग्रेन, टाईप 2 मधुमेह, हृदयरोग असे आजार आपल्याला होऊ शकतात. जर तुम्हाला दिवसाची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करायची असेल तर, पनीर भुर्जी हा एक उत्तम पर्याय आहे. आपण पनीरमध्ये टोमॅटो, कांदा, शिमला मिरची टाकून त्याची भुर्जी बनवू शकता.

अंडी पोषण समृद्ध आहेत. अंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंड्यामध्ये जीवनसत्व बी 12, डी आणि अँटीऑक्सिडेंट्स ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन असतात, ज्यामुळे आपल्या शरीरास बरेच फायदे होतात. अंड्यांद्वारे आपले वजन देखील कमी होते, अंड्यांमधील पौष्टिकतेमुळे आपली चयापचय ठीक होते. अंड्यांमध्ये भरपूर चरबी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

– ऋतुनुसार नाश्त्यात बदल करावा

– सकाळी खूप तेलकट व तिखट न्याहारीत बदल करावा

– न्याहारीत प्रथिने, कार्बोदके व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे

– फळे, भाज्या यांचा आहारात शक्यतो समावेश करावा

– आहारात नैसर्गिक भाजीपाला, फळे, धान्य यांचा वापर करावा

– सकाळी एक चमचा गायीचे तूप व एक कप गायीचे दूध घेणे गरजेचे आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने दूध घेताना त्यात चिमूटभर हळद व सुंठ पावडर टाकावी.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(It is beneficial to have breakfast in the morning)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.