जावा की बुलेट, कोणती बाईक भारी? किंमत, फीचर्स सर्व काही

मुंबई: महिंद्रा आणि महिंद्राने पुन्हा एकदा नवी जबरदस्त जावा ही बाईक भारतात लाँच केली आहे. जावा, जावा 42 आणि जावा बॉबर या तीन नव्या बाईक भारतीय बाजारात आल्या आहेत. जावाने तब्बल 23 वर्षांनंतर भारतात रिएंट्री केली. जावा बाईकचा नवा लूक, पॉवर आणि किंमत पाहिल्यास ही बाईक रॉयल एन्फिल्डच्या 350 सीसी बुलेटला टक्कर देऊ शकते, असे दिसते. भारतात रॉयल एन्फिल्ड भलेही अधिक लोकप्रिय …

जावा की बुलेट, कोणती बाईक भारी? किंमत, फीचर्स सर्व काही

मुंबई: महिंद्रा आणि महिंद्राने पुन्हा एकदा नवी जबरदस्त जावा ही बाईक भारतात लाँच केली आहे. जावा, जावा 42 आणि जावा बॉबर या तीन नव्या बाईक भारतीय बाजारात आल्या आहेत. जावाने तब्बल 23 वर्षांनंतर भारतात रिएंट्री केली. जावा बाईकचा नवा लूक, पॉवर आणि किंमत पाहिल्यास ही बाईक रॉयल एन्फिल्डच्या 350 सीसी बुलेटला टक्कर देऊ शकते, असे दिसते. भारतात रॉयल एन्फिल्ड भलेही अधिक लोकप्रिय असली, तरी जावा बाईकचा हा नवा लूक, तरुणांना आकर्षित करण्यास पुरेसा ठरेल असा विश्वास कंपनीला आहे. जावा बाईकचा स्टायलिंग लूक, फीचर्स खूपच दमदार आहेत. मात्र रॉयल एन्फिल्डला ती खरंच भारी ठरणार का? काय आहेत जावाचे फीचर्स? रॉयल एन्फिल्ड आणि जावामध्ये फरक काय? त्यावर एक नजर

– रॉयल एन्फिल्डच्या 350 सीसी बुलेटमध्ये सिंगल सिलिंडर तसेच ट्विन स्पार्क, एअरकुल्ड 346cc इंजिन आहे, जो 19.8 bhp पॉवर आणि 28 Nm टार्क जनरेट करतो. तसेच याच्या इंजिनमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स आहेत.

तर जावा बाईकमध्ये 293cc सीसीचं लिक्विड कुल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे, ज्याची पॉवर  27hp इतकी आहे आणि 28Nm इतका टार्क जनरेट करु शकतो. याच्या इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशन लावण्यात आले आहेत. तर इंजिन भारत स्टेज 6 मानकाचं आहे.

-जावा बाईकचा व्हीलबेस हा 1,369 mm आहे, तर 350cc बुलेटचा व्हीलबेस 1370 mm आहे.

-जावा बाईकची सीट हाईट  765 mm तर बुलेटची सीट हाईट  800 mm आहे.

– 90 टक्के इंधन टाकी भरली असेल तेव्हा जावा बाईकचे वजन 170 किलोग्राम असेल, तर बुलेटचे वजन 183 किलोग्राम इतके आहे.

– जावाची पेट्रोल टँक  14 लीटरची आहे तर बुलेटची पेट्रोल टँक ही 13.5 लीटरची आहे.

-जावा बाईकमध्ये समोर एबीएससोबतच 280mm डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये 153mm ड्रम ब्रेक सेट-अप देण्यात आला आहे. तर बुलेटमध्ये रिअर आणि फ्रंट दोन्हीबाजूने ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. आता रॉयल एन्फिल्ड देखील आपल्या बाईकमध्ये एबीएस लावत आहे. म्हणजे आता लवकरच आपल्याला बुलेटमध्येही एबीएस मिळेल.

-जावा बाईकमध्ये समोरच्या बाजूने टेलिस्कोपिक हायड्रोलिक फोर्क्स आणि रिअरमध्ये गॅसने चार्ज होणारे ट्विन शॉकअबझॉर्बस देण्यात आले आहेत. बुलेटमध्येही समोर टेलिस्कोपिक हायड्रोलिक फोर्क्स आणि रिअरमध्ये गॅसने चार्ज होणारे ट्विन शॉकअबझॉर्बस आहेत.

-जावा बाईकची एक्स शोरुमची किंमत 1 लाख 64 हजार रुपये इतकी आहे तर रॉयल एन्फिल्डची 350cc बुलेटची ऑन रोड किंमत 1 लाख 34 हजार 667 रुपये इतकी आहे.  दोन्ही किमती दिल्लीतील आहेत.

या नव्या जावा बाईकचे फिचर्स आणि त्याचा नवा, हटके लूक नक्कीच बाईकप्रेमींना आकर्षून घेण्यास यशस्वी ठरेल, असा दावा जावाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *