‘ग्रीन टी’मध्ये काळीमिरी आणि आलं घाला; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा!

‘ग्रीन टी’ त्याच्या अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांचे आवडते पेय बनले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:35 AM, 2 May 2021
'ग्रीन टी’मध्ये काळीमिरी आणि आलं घाला; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा!
ग्रीन टी

मुंबई : ‘ग्रीन टी’ त्याच्या अँटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांचे आवडते पेय बनले आहे. वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. ग्रीन टी मध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. सध्या वाढलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, ग्रीन टीमध्ये काळीमिरी आणि आलं टाकून पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. (Add ginger and black pepper to green tea to boost immunity)

सुंठ ग्रीन टीमध्ये टाकल्यावर सर्दी, ताप आणि खोकल्या सारख्या अनेक समस्या दूर होतात. यामुळे जेंव्हा सर्दी, ताप आणि खोकल्या येतो त्यावेळी ग्रीन टीमध्ये सुंठ टाकावी. आलं ग्रीन टीमध्ये टाकून पिण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर ग्रीन टीमध्ये काळीमिरी आणि आलं टाकून दिवसातून किमान चार ते पाच वेळा पिल्ले पाहिजे.

लिंबाचा रस ग्रीन टीच्या कडू चवीचा प्रतिकार करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीन-टीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. परंतु, आपल्या ग्रीन-टीला आधी थंड होऊ द्या आणि नंतरच त्यात थोडे लिंबू पिळून मग त्याचे सेवन करा.

ग्रीन टी मधील घटक शरीरातील मेटाबॉलिज्म घटकाला वाढवतात. त्यामुळे शरीरातील वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामासोबतच, फळ, पालेभाज्या यांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच यासोबतच ग्रीन टी चे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.

संबंधित बातम्या : 

(Add ginger and black pepper to green tea to boost immunity)